ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भाजपा महिला आघाडी शहरच्या वतीने महिला व मुलींसाठी खुली भव्य सायकल रेस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या वतीने दि. १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महिला व मुलींसाठी भव्य खुली सायकल रेस चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे पहिले बक्षीस रु. ५००० तर दुसरे बक्षीस रु. ३००० व तिसरे बक्षीस रु २००० आहे. तसेच प्रोत्साहनपर तीन बक्षीसे तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.

ही स्पर्धा दि. १४ एप्रिल २०२६ रोज मंगळवार ला सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून प्रारंभ होणार आहे. या सायकल रेसचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुंबळी मेंढा परत तुंबळी मेंढा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक असा राहणार आहे. तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त महिला व मुलींनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा महिला आघाडी शहरच्यावतीने करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये