विदर्भ समाजशास्त्र परिषदेचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाद्वारे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
विदर्भ मराठी समाजशास्त्र परिषद व राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सावली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय समाजशास्त्र अधिवेशन आज महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात व शैक्षणिक वातावरणात पार पडले. आदिवासी,ग्रामीण समुदाय दुर्बल घटक आणि आव्हाणे
या विषयावर वाहीलेले हे अधिवेशन आदिवासी व ग्रामीण प्रश्नांवर चिंतन-मंथन करणारे हे अधिवेशन विचारप्रवर्तक ठरले.
अधिवेशनाचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठ चे प्रकुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांच्या हस्ते झाले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार होते. बीजभाषक प्राचार्य डॉ. प्रदीप मेश्राम यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्रीकांत भोवते, प्राचार्य डॉ. ऐ. चंद्रमौली, डॉ. बी. एम. कर्हाडे, डॉ. रविंद्र विखार आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात डॉ. श्रीराम कावळे यांनी समाजशास्त्र विषयाच्या माध्यमातून आदिवासी व ग्रामीण समुदायाच्या समस्या, आव्हाने आणि त्यावर उपाय शोधण्याची जबाबदारी संशोधक व अभ्यासकांवर असल्याचे अधोरेखित केले. “या अधिवेशनातील चर्चा व चिंतनातून निश्चितच सकारात्मक आणि आश्वासक दिशा मिळेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बीजभाषक डॉ. प्रदीप मेश्राम यांनी आदिवासी समाजाच्या स्थितीचे वास्तववादी चित्र मांडले. त्यांनी नमूद केले की, मूळनिवासी असलेला आदिवासी आज विविध विकास प्रकल्पांमुळे विस्थापित होत असून, मालकीहक्क गमावून मजूर बनत आहे—ही चिंताजनक बाब आहे. त्यांनी भविष्यातील आव्हानांचा वेध घेत समाजशास्त्रज्ञांनी ठोस संशोधन व धोरणात्मक सूचना मांडण्याची गरज व्यक्त केली.
डॉ. श्रीकांत भोवते यांनी नवीन शैक्षणिक धोरण (NEP) आदिवासी व ग्रामीण भागासाठी मोठे आव्हान ठरणार असल्याचे सांगितले. शिक्षणातील समावेशकता, संसाधनांची कमतरता आणि अंमलबजावणीतील अडचणी याकडे त्यांनी लक्ष वेधले.
या अधिवेशनात दोन तांत्रिक सत्रांमध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. यात बबन मेश्राम व दिलीप रामटेके यांनी आदिवासी विकास, सामाजिक बदल आणि धोरणात्मक हस्तक्षेप यासंदर्भात आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.
समारोप सत्राचे अध्यक्ष डॉ. बी.एम कहाडे,प्रमुख अतिथी संस्थेचे कोषाध्यक्ष डॉ. विजय शेंडे , प्राचार्य डॉ. ऐ चंदमौली उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे समन्वयक डॉ. दिवाकर उराडे यांनी केले. संचालन प्रा. विनोद बडवाईक, डॉ. स्निग्धा कांबळे व प्रा. स्मिता राऊत यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. रविंद्र विखार,डॉ. पितांबर पिसे, संदीप देशमुख यांनी केले.
या प्रसंगी डॉ. डी. व्ही. घोडेस्वार, डॉ. बालाजी दमकोंडवार, डॉ. गजेंद्र कढव, डॉ. संजय चव्हाण यांच्यासह अनेक प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच, आदिवासी व ग्रामीण समाजाच्या प्रश्नांवर शास्त्रशुद्ध चर्चा घडवून आणत, संशोधनाला नवी दिशा देणारे हे अधिवेशन यशस्वी ठरले.



