उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या कार्यालयातील कर्मचारी यांची दारूबंदी विरुद्ध केलेली कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि 08/04/26 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट यांच्या कार्यालयातील अंमलदार यांना दोन इसम हे पांढऱ्या रंगाच्या हुंडई क्रेटा क्रमांक MH 40 BC 0019 मध्ये जिल्हा चंद्रपूर येथून नागरी मार्गे अवैध विदेशी दारू घेऊन हिंगणघाट शहराकडे येणार आहे अश्या खाञीशीर खबरे वरून हिंगणघाट ते नागरी रोड वरील मौजा मानोरा फाटा येथे पंच व पो.स्टॉप सह नाकेबंदी करून खबरे प्रमाणे अवैध विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या पांढऱ्या हुंडाई क्रेटा कार थांबवून त्याच्या कडील कारचा दरवाजा उघडून त्यांचे नाव विचारले असता आरोपी चालक याने त्याचे नाव मोहम्मद अशरफ उर्फ गुड्डू मोहम्मद कलीम खोकर, रा. शिवाजी वॉर्ड, हिंगणघाट व व त्याच्या बाजूच्या सीटवर बसलेल्या इसमाने त्याचे नाव अनुराग राजेश नंदागवळी, रा. महात्मा फुले, वॉर्ड ,हिंगणघाट असे सांगितले, वरून कार ची झडती घेतली असता कारच्या मागच्या सीटच्या खाली व डिक्की मध्ये बडवायजर मॅग्नम कंपनीच्या दहा खर्ड्याच्या खोक्या मध्ये 500 ml चे 240 बियरचे सील बंद टीन चे डब्बे मिळून आले जागीच सविस्तर मौक्का जप्ती पंचनामा कारवाई करून पांढऱ्या रंगाच्या हुंडाई क्रेटा कार क्रमांक MH 40 BC 0019 किंमत 10,00,000/ व व 10 खर्ड्याच्या खोक्या मधील बडवाईसर मॅग्नम कंपनीचे 500 ml चे 240 टीन चे सील बंद डब्बे किंमत 72,000/ रु असा जु की 10,72,000/- रु चा माल मिडून आल्याने, पो स्टे, हिंगणघाट येथे परत येवुन आरोपी विरूध्द गुन्हा नोंद केला.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री सौरभ अग्रवाल सा., मा अप्पर पोलीस अधिक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी हिंगणघाट श्री. सुशील कुमार नायक सा . यांचे निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी सा हिंगणघाट यांचे कार्यालयातील,पोलीस हवालदार अश्विन सुखदेवे, पोलीस हवालदार चेतन पिसे, पोलीस हवालदार रवींद्र घाटुर्ले, पोलीस हवालदार उमेश लडके, पोलीस हवालदार राहुल साठे, पोलीस हवालदार सतीश घवघवे,PSI प्रेमराज अवचट,ASI गोविंद हदवे , पोलीस शिपाई भारत भूटलेकर, पोलीस शिपाई अनंत हराळ यांनी केली



