गॅस सिलेंडर टंचाईसह विविध मागण्यांसाठी वंचितचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
राज्य भरात सरू असलेली गॅसटंचाई, गॅस कमतरतेमुळे दैनंदिन जिवनावर होणारे परिणाम आणि तालुक्यातील विविध मागण्यांना घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करण्यासंदर्भात गोंडपिपरी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असंख्य कार्यकर्त्यांसह आज (६ एप्रिल) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. ‘‘नरेंदर.. कब मिलेगा सिलेंडर..!” आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे तालुक्यातील मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सदर निवेदन देण्यात आले.
गॅस टंचाईमुळे दैनंदिन जिवन, रोजीरोटी, रोजगार, घरातील स्वंयपाक, चहाच्या टप-या, रस्त्यावरील खादयपदार्थाचे स्टाॅल तसेच धार्मीक कार्यक्रम सोेेबत शैक्षणिक विद्यार्थ्यांना जेवन न मिळणे यांसारख्या विविध कारणाने अनेकांना कोळसा आणि इतर लाकूडफाट्यांच्या वापराने चुलीवर स्वयंपाक करून जिवन जगावे लागत आहे. महाराष्ट्रातील हजारे लघू व्यावसायीकांनी आपले दुकाने बंद केली आहेत. एकंदरित महाराष्ट्रातील सामान्य जनजिवन एलपीजी गॅसमुळे विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी गॅसचा काळाबाजार होत आहे. काही ठिकाणी तर गॅसमध्ये पाणी भरलेले प्रकार समोर आले आहेत. सरकार वारंवार दावा करतो कि,तुटवडा नाही परंतु हे साफ खोटे आहे.
गॅस टंचाई रोखावी, गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखावा, २५ दिवसात गॅस सिलेंडर मिळेल हि अट शिथील करण्यात यावी, गॅसचा काळाबाजार करणा-यांवर सक्त कार्यवाही करण्यात यावी, वसतीगृहात राहणा-या विद्यार्थ्यांसाठी कम्युनिटी किचन सुरू करावी, राज्यात अनेक ठिकाणी केवासयी नाही म्हणून गॅस वितरण केल्या जात नाही,त्यांना तातडीने गॅस दिल्या जावा, जिल्हाधिकारी यांनी जिल्यामध्ये उज्वला गॅस योजनेअंतर्गत किती लोकांना गॅस सिलिंडर दिले आहेत, यांचे आडिट करावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष भारत चंद्रागडे, ज्येष्ठ नेते विनोद दुर्गे, मोरेश्वर दुर्गे, पोपटलाल भसारकर, लक्ष्मण रामटेके यांसह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.



