ताज्या घडामोडी

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मारोती परचाके यांचे निधन

विद्युत दुरुस्तीवेळी करंट लागून अपघात; आठवडाभर उपचारानंतर मृत्यू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

 पोंभुर्णा : पोंभुर्णा येथील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मारोती केशव परचाके (वय 59) यांचे आज जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.ते वायरमनचा काम करीत होते मागील आठवड्यात शेतातील विद्युत पुरवठा दुरुस्त करताना खांबावर चढलेल्या अवस्थेत त्यांना करंट लागून ते खाली कोसळले होते. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.

घटनेनंतर त्यांना तातडीने पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र आठवडाभराच्या उपचारांनंतरही त्यांची प्रकृती सुधारली नाही आणि अखेर त्यांचा मृत्यू झाला.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मारोती परचाके यांनी पोंभुर्णा ग्रामपंचायत सदस्य, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशी विविध पदे भूषवून स्थानिक स्तरावर कार्य केले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये