गोंडपिपरी काँग्रेस कार्यकर्त्यांचा संघटनात्मक बांधणीवर सृजन अभियानांतर्गत संवाद
कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याची वरिष्ठांना विनंती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस द्वारा भारतातील सर्व राज्यात संघटन सृजन अभियान अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात तसेच तालुक्यातील काँग्रेसचे संघटन मजबूत करण्यासाठी आढावा बैठकांचे आयोजन करण्यात येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज संकुल (सुपर मार्केट हाल) राजुरा येथे राजुरा विधानसभा काँग्रेसच्या वतीने राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुका व शहर काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक (६ एप्रिल) आयोजित करण्यात आली होती. यावेळी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निरीक्षक संतोष कोलकोंडा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक अभय छाजेड, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष याशिम शेख, खासदार प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गोंडपिपरी तालुक्यातील काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक रेचणकर, युवा अध्यक्ष विपिन पेदुलवार, अजय माडूरवार, देविदास सातपुते, सारनाथ बक्षी, महेश सोनकुलवार, महेंद्र कुणघाटकर, शहराध्यक्ष राजू झाडे, राजेश डोंगरे, प्रशांत कोसणकर, महिलाध्यक्षा सोनी दिवसे, पायल दुर्गे, साईराज अलोने यांच्यासह तालुक्यातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या आढावा बैठकीत उपस्थिती दर्शवून आपल्या पक्षाविषयी संघटनात्मक बांधणी आणि कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करीत असलेल्या भावना आणि पक्ष बांधणीसाठी योग्य ते विचार परीक्षकासमोर मांडले.



