भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस आपल्या विचारसरणी संघर्ष आणि देशसेवेच्या अखंड प्रवासाचा स्मरणदिन – आ. किशोर जोरगेवार
भारतीय जनता पार्टी स्थापना दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन, युवकांचा पक्षप्रवेश

चांदा ब्लास्ट
भारतीय जनता पार्टी ही केवळ एक राजकीय पक्ष नाही, तर ती राष्ट्रसेवा, जनसेवा आणि विकासाच्या विचारधारेवर चालणारी एक मोठी चळवळ आहे. भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसून, तो आपल्या विचारसरणीचा, संघर्षाचा आणि देशसेवेच्या अखंड प्रवासाचा स्मरणदिन असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर च्या वतीने भारतीय जनता पार्टी ४६ वा स्थापना दिना निमित्त महानगर कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विजय राउत, माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, नेते प्रकाश देवतळे, बलराम डोडाणी, महामंत्री रविंद्र गुरुनुले, श्याम कनकम, मनोज पाल, मनपा गटनेते शेखर शेट्टी, विधानसभा महिला अध्यक्ष वंदना हातगावकर, दशरथसिंह ठाकुर, मंडळ अध्यक्ष प्रदिप किरमे, रवी जोगी, सुभाष अदमाने, अॅड सारिका संदुरकर, महामंत्री नामदेव डाहुले, भारतीय जनता पार्टीच्या माजी महिला शहर अध्यक्षा तथा नगर सेविका सविता कांबळे, नगर सेविका शितल गुरुनुले, पूष्पा उराडे, आशिष मासिरकर, नगर सेविका ज्योती जिवने, आशा देशमूख, आदिं मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘अंत्योदय’च्या विचारातून प्रेरणा घेत, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा संकल्प आपण केला आहे.आपल्या पक्षाने नेहमीच राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान दिले आहे. देशाच्या प्रगतीसाठी, गरीब, शेतकरी, महिला, युवा आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी भारतीय जनता पार्टीने सातत्याने काम केले आहे. आज देशाच्या प्रत्येक कोपर्यात विकासाची गंगा पोहोचत आहे, हे आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.
भारतीय जनता पार्टीची खरी ताकद ही आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा खरा प्रतिनिधी आहे. आपण सर्वांनी निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव या तत्त्वांवर काम केले पाहिजे. जनतेशी सतत संपर्क ठेवून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी जनसेवा आहे. आजचा दिवस आपल्याला आत्मपरीक्षण करण्याचाही आहे. आपण आतापर्यंत काय केले, पुढे काय करायचे आहे, याचा विचार करून अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातही आपण विकासाच्या अनेक कामांना गती दिली आहे. पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रोजगार या सर्व क्षेत्रांत आपण सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचहून नवीन कार्यकर्ते तयार करावे आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सक्रिय भूमिका निभावावी.
भारतीय जनता पार्टी ही सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या तत्त्वावर चालणारा पक्ष आहे. या विचारधारेचा प्रसार करणे ही आपली जबाबदारी असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नितेश पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
भारतीय जनता पार्टीच्या वाढत्या प्रभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला असून, विविध पक्षांतील तसेच सामाजिक क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज मोठ्या उत्साहात आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
नव्याने प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत जनसेवेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भारतीय जनता पार्टी ही देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह राजकीय संघटना बनली आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीमुळे आणि विकासाभिमुख धोरणांमुळे विविध स्तरांवरील कार्यकर्ते पक्षाकडे आकर्षित होत आहेत.
या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत होणार असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला मोठे बळ मिळणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पक्षाचा दुपट्टा टाकून सर्व नवीन कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.


