ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग येथे मायनिंग अँड माईन सर्वेर्यींग विभागातर्फ मॉडेल प्रदर्शनचे आयोजन

चांदा ब्लास्ट

           महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सोमय्या डिप्लोमा इन इंजिनीरिंग कॉलेज वडगाव चंद्रपूर येथील मायनिंग अँड माईन सर्वेर्यींग विभागाच्या वतीने मॉडेल प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून अंडर ग्राऊंड मेटल मायनिंग, लॉंगवाल मायनिंग, रॉक सायकल , माईन सेफ्टी अशा विविध विषयांवर आकर्षक मॉडेल सादर केले.

          ह्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी संस्थेचे संस्थापक श्री.पी.एस आंबटकर, उपाध्यक्ष श्री.पियुष आंबटकर,सेक्रेटरी सौ.प्रीती आंबटकर, डायरेक्टर सौ.अंकिता आंबटकर श्री. रोहित कोडेवार (WCL),श्री. निलेश ठाकूर (NCL) प्राचार्य जमीर शेख , प्रा. भारत बाबरे, प्रा.डॉ. नितेश चव्हाण उपस्थित होते .

      ज्ञानाचा उपयोग, विद्यार्थ्यांना पुस्तकात शिकलेलं ज्ञान प्रत्यक्ष मॉडेलच्या माध्यमातून दाखवता येतं, Creativity आणि Innovation वाढवणे,नवीन कल्पना (ideas) आणि वेगवेगळ्या पद्धतीने सादरीकरण करण्याची संधी मिळते.

           तसेच Communication Skills सुधारणा करणे तसेच आपल्या मॉडेलचं explanation देताना बोलण्याची व समजावण्याची skill improve होते,Teamwork शिकणे,ग्रुपमध्ये काम केल्यामुळे सहकार्य (cooperation) आणि समन्वय (coordination) वाढतो,Confidence वाढवणे,लोकांसमोर model explain केल्यामुळे आत्मविश्वास वाढतो.

       टेकनिकल विशेषतः विध्यार्थांचे कॉनसेप्ट क्लिअर होतात तसेच Internal marks किंवा practical assessment साठीही exhibition घेतली जाते.

मायनिंग विभागातील सदर १३ ग्रुपने आपले मॉडल प्रदर्शन केले होते, यामध्ये पहिला क्रमांक खुशी पासवान आणि ग्रुप तसेच गौरव पोगन आणि ग्रुप यांचा दुसरा क्रमांक आला ,नंदिनी अहिरकर आणि ग्रुप यांचा दुसरा क्रमांक आला तसेच तिसरा क्रमांक एशवान दुर्गे आणि ग्रुप यांचा आला.

         कार्यक्रमाचे संचालन प्रा. संतोश दत्ता यांनी केले आणि संयोजन प्रा.आशिष भरडकर,प्रा. प्रतीक दातार, प्रा. विनय,प्रा.तरुण यांनी समन्वयक म्हणून विशेष परिश्रम घेतले.

या यशासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर यांनी विधार्थ्यांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये