ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी डॉ. मनीष मुंधडा यांची निवड _ कार्याध्यक्षपदी मंगेश खाटीक

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी 

जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर 

     सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, पर्यावरण आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या अध्यक्षपदी डॉ. मनीष मुंधडा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सोबतच कार्याध्यक्ष म्हणून मंगेश खाटीक यांना नियुक्त करण्यात आले. समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गोपाल मुंधडा यांचे 5 फेब्रुवारी 2026 रोजी निधन झाले. तेव्हापासून समितीचे अध्यक्षपद रिक्त होते.

      सायंकाळी डॉ. भारती मुंधडा हॉस्पीटलच्या सभागृहात सदर नियुक्तीसाठी सर्व सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे महासचिव मधुसूदन रुंगठा, उपाध्यक्ष विजय चंदावार, मोहम्मद जिलानी, डॉ. बि. डी. पालीवाल, संघटन सचिव क्रांती दहिवडे उपस्थित होते. सर्वप्रथम दिवंगत अध्यक्ष डाॅ. गोपाल मुंदडा यांच्या प्रतिमेला सर्वांनी पुष्प अर्पण करुन आदरांजली वाहिली. त्यानंतर बैठकीला सुरुवात करण्यात आली.

     मधुसुदन रुंगठा यांनी, समितीच्या नुतन अध्यक्षपदी डॉ. मनीष मुंधडा यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. त्यांच्या नावाला सर्व सदस्यांनी उत्साहाने सहमती दिली. त्यानंतर डॉ. मनीष मुंधडा यांना बैठकीत आमंत्रित करण्यात आले. डॉ. मुंधडा यांनी अध्यक्षपद स्वीकारताना, कार्याध्यक्ष म्हणून मंगेश खाटीक यांच्या नावाची शिफारस केली. तेव्हा खाटीक यांच्याही नावाला सर्वांनी मंजुरी दिली. त्यानंतर नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे उपस्थितांनी अभिनंदन केले.

     विजय चंदावार, मोहम्मद जिलानी, मधुसूदन रुंगठा यांनी, संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. गोपाल मुंधडा यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला. समितीसाठी त्यांचे कार्य खुप मोठे होते. त्यांची जागा घेणे कुणालाही शक्य नाही. परंतु, संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी अध्यक्षपदी कुणाची तरी नियुक्ती करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी डॉ. मनीष मुंधडा हे नाव उपयुक्त आहे, असे मत व्यक्त केले.

    नगरसेविका वनश्री मेश्राम यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मंगेश खाटीक यांनी केले. संचालन आशिष बाला यांनी, तर आभार प्रदर्शन समितीचे कोषाध्यक्ष विलास माथनकर यांनी केले. यावेळी सुबोध कासुलकर, संजय रामगिरवार, सुधाकर कावडे, डॉ. स्वपनकुमार दास, सूर्या खजांची, सपना नामपल्लीवार, कपिश उसगावकर, रश्मी वैरागडे, अरूणा शिरभय्ये, क्रांती दहिवडे, पवन शेळके, दिनेश जुमडे, रश्मी सप्रे, विणा खोब्रागडे, शुभांकर जीवनकर, संजीवनी कुबेर, केशव मेश्राम, शरयू कुबेर, नितीन डोंगरे उपस्थित होते.

‘सीबीएसएस’ माझा परिवारः डॉ. मनीष मुंधडा

       चंद्रपूर बचाव संघर्ष समिती माझ्या वडिलांचे स्वप्न आहे. ते प्रत्यक्षात उतरवण्याचे काम समितीच्या सर्व सदस्यांनी केले. स्व. डॉ. गोपाल मुंधडा यांच्या नेतृत्वात समितीच्या उन्नतीसाठी सर्व सदस्यांनी अतिशय उत्तम कार्य केले आहे. त्यांच्यासाठी जसा मी होतो तसेच तुम्ही सर्व होते. त्यांनी ‘सीबीएसएस’ला आपला परिवार मानले. त्यामुळे हा माझाही परिवारच आहे. आपण सर्व मिळून या समितीला यशाच्या शिखरावर नेऊ या, असे आवाहन डॉ. मनीष मुंधडा यांनी याप्रसंगी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये