
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
हिंगणघाट : पिंपळगाव रोड, संत तुकडोजी महाराज वॉर्ड येथील श्री. बालाजी हनुमान मंदिर सेवा ट्रस्ट यांच्या वतीने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम गुरुवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी दुपारच्या सुमारास आयोजित करण्यात आला होता.
या पवित्र उत्सवानिमित्त मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे, जन्मोत्सवानिमित्त अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अन्नदानाचा लाभ जवळपास सहाशे भाविकांनी घेतला. समाजातील सर्व घटकांनी मोठ्या श्रद्धेने व उत्साहाने सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री. किशोर नोकरकार, उपाध्यक्ष किशोर मुटे,सचिव आकाश नोकरकार, सहसचिव अभिषेक उराडे, कोशाध्यक्ष राजू मंडलवार तसेच सदस्य विशाल उराडे, गजानन देवढे, केशव उमाटे, मंगेश पहाडे, संतोष डांगरे, अनिल शिगरू यांनी विशेष सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून समाजात सेवा, एकता व भक्तीभावाचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



