शिवसेना शिंदे गटाच्या नव्या नियुक्त्या
पूर्व विदर्भ विभागीय संपर्कप्रमुख पदी आ. डॉ.. मनीषा कायंदे यांची तर चंद्रपूर लोकसभा संपर्क प्रमुख पदी आ. कृपाल तुमाने यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पुर्व विदर्भात शिवसेना शिंदे गटाचे संघटन अधीक मजबूत करुन या भागात पक्षाचे प्राबल्य वाढविण्यासाठी शिवसेना शिंदे गटातर्फे पक्षप्रमुख तथा ऊपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनात तथा शिवसेना नेते खा.डा. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यानुसार पुर्व विदर्भ विभागीय संपर्कप्रमुख पदावर आ. डा. मनीषा कायंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्याकडे पुर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गटाच्या चंद्रपूर लोकसभा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी आ. कृपाल तुमाने यांच्याकडे देण्यात आली आहे.
पुर्व विदर्भ विभागीय संपर्कप्रमुख पदावर आ. डा. मनीषा कायंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याने पुर्व विदर्भात शिवसेना शिंदे गटाचे संघटन मजबूत होईल तसेच चंद्रपूर लोकसभा संपर्क प्रमुख पदावर आ.कृपाल तुमाने यांची नियुक्ती करण्यात आल्याने या भागात पक्षाचे संघटन मजबूत होऊन पक्ष निश्चीतपणे वाढेल असा विश्वास यावेळी पक्षातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.



