ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यात तीन दिवस वादळी पावसाची शक्यता

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         चंद्रपूर जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय यांनी दि.०१ ते ०३ तारखेपर्यंत वादळी वारे, विजेचा कडकडाट सह गारपीठ होण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन केले आहे.

मुसळधार पाऊस व वादळी वाऱ्यापासून संरक्षणार्थ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, शक्यतो वादळी वारे व विजेचा कडकडाड सुरू असताना घरा बाहेर पडू नये तसेच झाडे विद्युत खांब, तात्पुरते अस्थायी शेड यापासून दूर रहावे, घरातील विद्युत उपकरणे बंद ठेवावी, पाऊस सुरू असताना शक्यतो दुचाकी व इतर वाहने चालविणे टाळावे. अश्या जनहितार्थ मार्गदर्शक सूचना जिल्हा कार्यालयाने जारी केल्या आहेत.

याच पार्श्वभूमीवर भद्रावती तालुक्यातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन सतर्कता बाळगावी असे आवाहन तहसीलदार राजेश भांडारकर यांनी सुद्धा केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये