काँग्रेस पक्षाचे विचार तळागळा पर्यंत पोहचवा _ संदीप शेळके

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
काँग्रेस पक्षाचे विचार शहरी तथा ग्रामीण भागात तळागळा पर्यंत पोहचवा, असे आवाहन काँग्रेस पक्षाचे युवा नेते संदीप शेळके यांनी देऊळगाव राजा येथे संवाद दौरा निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यकर्ता बैठकीत बुधवारी केले.
विश्राम गृह येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात संदीप शेळके यांनी काँग्रेस पक्षाचे योगदान स्वातंत्र्य काळापासून महत्त्वाचे असून देशासाठी इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी बलिदान दिले असून राहुल गांधी लढा देत आहेत त्यांच्या पाठीमागे उभे राहून काँग्रेस पक्षाचे विचार ग्रामीण भागातील शेवटच्या व्यक्ती पावेतो पोहोचवा असे आवाहन त्यांनी केले, काँग्रेस पक्षात जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या युवा कार्यकर्त्यांना संघटित करून पक्ष मजबूत करण्यासाठी संवाद दौरा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले. युवा नेते संदीप शेळके यांचा तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी काँग्रेसचे पंचायत राज समिती चे राज्य सरचिटणीस अमोल तायडे, पृथ्वी सिंग राजपूत,,काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अनिल सावजी, रमेश दादा कायंदे, तालुका अध्यक्ष रामदास डोईफोडे, शहर अध्यक्ष अतिश कासारे, हनीफ शहा, धोंडीराम लंके, अनिल गवई, समाधान पाबळे, प्रकाश राजे, रविभाऊ इंगळे, प्रा अशोक डोईफोडे, सय्यद अली, मुबारक खान, अयुब भाई, गणेश आडे, यश कासारे, लुंगे, तथा इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



