अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने दत्ता मेघे मेडिकल कॉलेज येथे 26 जुनला कार्यक्रम करण्यात आला साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन सावंगी मेघे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने 26 जुन रोजी संबंधाने दिनांक 25/06/2026 रोजी सकाळी 09/00 वाजता दत्ता मेघे मेडिकल कॉलेज सावंगी मेघे येथे कार्यक्रम आयोजीत करून अंमली पदार्थापासुन कशाप्रकारे आपल्याला त्यापासुन सावध राहता येईल. तसेच नशामुक्ती आणि जागरूकतेसाठी व नविन युवा पिढी ही विविध वेगवेगळ्या व्यसनाच्या जाळ्यात अडकत चाललेली आहे. क्षणिक सुख्याच्या आणि आनंदाच्या मोहापाई अनेक तरूण स्वतःचे आयुष्य स्वतःचे भविष्य देशोधडीला लावत आहेत. व्यसन मग कोणत्याही प्रकारचे असो माणसाची विचार करण्याची क्षमता नष्ट करते.
व्यसनाचा या विळख्याला तोडण्यासाठी आपल्या सर्वाना एकत्र यावे लागेल. सदरचे मार्गदर्शन अंमली पदार्थ विरोधी दिन 26 जुन संबंधाने करून सदर संबंधाचा व्हिडीओ विदयार्थांना पीपीटी वर दाखविण्यात आला. सदर कार्यक्रमामध्ये कॉलेज मधील प्राध्यापक तसेच कर्मचारी स्टाफ व 250 ते 300 विदयार्थी व विदयार्थीनीचा सहभाग होता.
सदर चा कार्यक्रम हा श्री. सौरभ अग्रवाल, पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. सदाशिव वाघमारे, अप्पर पोलीस अधिक्षक वर्धा, श्री. प्रमोद मकेश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा यांच्या मार्गदर्शनात श्री. विनोद गिरी, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे व पोलीस अमंलदार अक्षय हिवरे यांनी यशस्वीरित्या पार पाडला,
(विनोद गिरी) ठाणेदार / पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सावंगी मेघे



