ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांना ‘नानक-साई‘ अवॉर्ड जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल पाटील

         शेतकरी कामगार कष्टष्करी यांच्या विकासाचे केंद्र बिंदू असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांना नानक साई अवॉर्ड जाहीर झाला आहे. येत्या 25 मार्च रोजी शिर्डीत होत असलेल्या विशाल साई भक्त संमेलनात या अवॉर्ड’ चे वितरण प्केले जाणार आहे.

साईभक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या शिर्डी तयंदाच्या रामनवमीच्या निमित्ताने आणखीनच खास होणार आहे. नानक साई फाउंडेशनतर्फे ‘विशाल साई भक्त संमेलन’ आणि सातव्या ‘नानक साई अवॉर्ड फंक्शन’ चे आयोजन केले आहे, ज्यामध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांना प्रतिष्ठेचे नानक साई अवॉर्ड प्रदान होणार आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला व कामगार यांच्या विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या चंद्रपूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून बँकेचे अध्यक्ष श्री रवींद्र शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बँकेने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. बचत गट क्षेत्रात राज्यात प्रथम क्रमांक मिळवणे तसेच बँकेने ९६ कोटींचा नफा मिळवणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या कार्याची दखल घेऊनच सीईओ राजेश्वर कल्याणकर यांना बँकेचा प्रतिनिधी म्हणून पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे अशी माहिती नानक साई फाउंडेशनचे प्रमुख पंढरीनाथ बोकारे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

श्री साई बाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, शिर्डी नगर पंचायतच्या अध्यक्षा सौ.जयश्रीताई विष्णुपंत थोरात, नानक साई फाऊंडेशनचे अध्यक्ष व संत नामदेव घुमान सद्भावना यात्रेचे संयोजक पंढरीनाथ बोकारे, साई सेवा ट्रस्ट चे प्रमुख सरदार प्रीतम सिंग भाटिया यांच्या उपस्थितीत साई भक्त संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये