ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मयंक गहुकर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी.

राजेंद्र मर्दाने, वरोरा

वरोरा :येथील सेंट अ‍ॅनिस पब्लिक स्कूलचा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी मयंक पंकज गहुकर याने ९१.२५ टक्के गुण मिळवत नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्रता मिळवली आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा असते. अशा कठीण स्पर्धेत मयंकने यश संपादन करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. नवोदय विद्यालये ही केंद्र शासनाच्या वतीने चालवली जात असून इयत्ता ६ वी साठी घेण्यात येणाऱ्या परिक्षेत चंद्रपूर जिल्ह्यासाठी त्याने पात्रता मिळविली आहे.

मयंकच्या या यशामागे त्याची मेहनत, पालकांचे मार्गदर्शन आणि शिक्षकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. त्याच्या या यशामुळे वरोरा शहराच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये