ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषद भद्रावती व Wild CER यांची संयुक्त मोहीम

भटक्या कुत्र्यांचे अँटी रिबीज लसीकरण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

नगर परिषद भद्रावती व Wild CER यांची संयुक्त मोहीम

         नगर परिषद भद्रावती यांच्या वतीने शहरातील भटक्या कुत्र्यांमधील रेबीजचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. याअंतर्गत *नगर परिषद भद्रावती व Wild CER* यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात भटक्या कुत्र्यांचे अँटी रिबीज लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

ही मोहीम दिनांक २१ मार्च पासून सुरू करण्यात येत असून शहरातील विविध प्रभागांमध्ये टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. प्रशिक्षित पशुवैद्यकीय पथकाच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांना सुरक्षितरीत्या पकडून त्यांचे अँटी रिबीज लसीकरण करण्यात येत आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश रेबीजसारख्या प्राणघातक आजारावर नियंत्रण ठेवणे, नागरिकांमध्ये सुरक्षितता निर्माण करणे तसेच प्राण्यांबाबत मानवतावादी दृष्टीकोन वाढविणे हा आहे.

 नगर परिषद भद्रावती तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या मोहिमेस सहकार्य करावे, लसीकरण पथकास आवश्यक ती मदत करावी अश्या आशयाचे आवाहन मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी व नगराध्यक्ष प्रफुल चटकी यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये