ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिक शहराच्या सर्वांगीण विकासामध्ये जायंट्स परिवाराची साथ महत्त्वाची

महापौर हिमगौरी अहेर आडके 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

नाशिक शहरात दिनांक 14 मार्च 26 रोजी *जायंटस ग्रुप ऑफ नाशिक प्राईड* या सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा शपथविधी कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्षिय भाषणातून नाशिकच्या महापौर हीमगौरी अहेर आडके यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना सांगितले की नाशिककरांनी माझे वर विश्वास दाखवत मला महापौर होण्याची संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचं मी तुमच्या सहकार्याने सोने करण्याचा प्रयत्न करणार आहे नाशिक शहराचा सर्वांगीण विकास झपाट्याने करण्याचा माझा मानस असून पुढील वर्षी नियोजित बारा वर्षानंतर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्यासाठी आपणा सर्वांना मिळून येणाऱ्या भाविक भक्तांची व्यवस्था करायची आहे देशपातळीवर या कुंभ मेळाव्याची चर्चा होणार असून देश विदेशातून या कुंभ मेळाव्यासाठी भाविक येणार आहेत यासाठी प्रत्येक वेळी जायंटस परिवाराची मला साथ मिळावी असे आवाहन करत नाशिककरांनी सुद्धा मला वेळोवेळी विकास कामे करताना मार्गदर्शन करण्याचे सुचविले यावेळी नाशिक प्राइडच्या अध्यक्षपदी पराग राठी तर सचिव पदी प्रेरणा तनेजा यांची निवड करण्यात आली.

 याबाबत सविस्तर अशी की जायंटस वेल्फेअर फाउंडेशन द्वारा संचलित जायंटस ग्रुप ऑफ नाशिक प्राईड ची नाशिक शहरात 13 वर्षांपूर्वी स्थापना झाली या ग्रुपच्या वतीने दरवर्षी सामाजिक क्षेत्रात फार मोठे योगदान असून *पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया* अशी टीम ठेवत नाशिक करा साठी गेल्या वर्षी ठीक ठिकाणी पानपोई ,रुग्णांना अन्नदान, वृक्ष लागवड व संगोपन, शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप, विद्यार्थिनींना सॅनिटरी पॅड वाटप, कार्डीयाक रुग्णवाहिकेसाठी आवश्यक साहित्य वाटप, दंत चिकित्सा शिबिर, रक्तदान शिबिर, पाणी शुद्ध करण्याची यंत्र वाटप ,विद्यार्थिनींना सायकल वाटप, असे जवळपास 25 प्रोजेक्ट घेण्यात आले 2025 चे ग्रुप चे अध्यक्ष सीए अनिरुद्ध जाजू , सचिव रीचा पमनानी व त्यांच्या संपूर्ण टीमने केलेल्या कामाबद्दल त्यांना इंटरनॅशनल कडून सन्मानित करण्यात आले तर 2026 साठी अध्यक्ष म्हणून पराग राठी तर सचिव पदी प्रेरणा तनेजा व त्यांच्या संपूर्ण टीमला शपथ देण्यात आली.

यावेळी नाशिकच्या महापौर हीमगौरि ताई अहेर आडके, राजश्री शाहू महाराज तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत पाटील, स्पेशल कमिटी मेंबर विनोद शेवतेकर, सूर्यमाला मालानी, जगन्नाथ साळुंखे, फेडरेशनचे अध्यक्ष जुगल किशोर हरकुट, सेक्रेटरी सन्मती जैन, को ऑर्डीनेतटर सुमित गुप्ता, डायरेक्टर रंजना भावसार उपस्थित होते यावेळी नाशिक प्राइड ने केलेल्या कार्याची प्रशंसा करण्यात आली व महापौर हिमगौरीं आडके यांनी संबोधित करताना सांगितले की नाशिक शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मला सर्व नाशिककरांची साथ यासोबतच सामाजिक क्षेत्रात काम करणारे NGO यांची सुद्धा वेळोवेळी मदत लागेल सर्वांचे योग्य वेळी सहकार्य मिळाल्यास नाशिककरांच्या साक्षीने शहरात भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार असून महानगरपालिका च्या वतीने देण्यात येणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉक्टर प्रितेश जुनागडे व पूनम सुराणा तर आभार प्रेरणा यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये