ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार श्री 2026 बॉडीबिल्डिंग स्पर्धेत योगेश शेंडे ओव्हरऑल विजेते

गिरीराज काळे ‘बेस्ट पोझर’ तर राहुल बागडे ‘बेस्ट इम्प्रूव्हमेंट’

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ श्री माता महाकाली क्रीडा महोत्सव 2026 अंतर्गत माननीय आमदार श्री किशोरजी जोरगेवार (चंद्रपूर विधानसभा क्षेत्र) यांच्या संकल्पनेतून भव्य “आमदार श्री 2026” बॉडीबिल्डिंग स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेला बॉडीबिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन विदर्भ यांची मान्यता असून चंद्रपूर बॉडी बिल्डर्स अँड फिटनेस असोसिएशन, चंद्रपूर यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेत विदर्भातील अनेक बॉडीबिल्डर्सनी सहभाग घेत आपल्या दमदार शरीरसौष्ठवाचे प्रदर्शन केले. विविध वजन गटात खालीलप्रमाणे स्पर्धक विजयी ठरले :

55 किलो गट – आयुष बेंद्रे (भंडारा)

60 किलो गट – राहुल बागडे (नागपूर)

65 किलो गट – गिरीराज काळे (नागपूर)

70 किलो गट – शेख सलीम शेख कलीम (अकोला)

75 किलो गट – श्रावण बावणे (नागपूर)

ओपन गट – योगेश शेंडे (नागपूर)

यामध्ये ओव्हरऑल “आमदार श्री 2026” हा किताब योगेश शेंडे (नागपूर) यांनी पटकावला.

तर बेस्ट पोझर पुरस्कार गिरीराज काळे (नागपूर) यांना मिळाला, तर बेस्ट इम्प्रूव्हमेंट पुरस्कार राहुल बागडे (नागपूर) यांनी पटकावला.

या स्पर्धेचे मुख्य आकर्षण म्हणून मुंबईचे प्रसिद्ध बॉडीबिल्डर हरमित सिंग रंधवा उपस्थित होते. त्यांनी Mr. India Gold Medal (2023, 2024, 2025) तसेच Maharashtra Shree Overall हा किताब दोन वेळा जिंकण्याचा मान मिळवला आहे.

स्पर्धेचे रेफरी म्हणून अविनाशजी लोखंडे आणि अभिषेकजी कारिंगवर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संचालन राजूजी कोतेवार यांनी केले. आयोजनात विशाल शिंदे, प्रीतम पाटील, टिकू शिंदे, नितीन गावंडे आणि किशोरजी आदमने यांनी मोलाची भूमिका बजावली.

या कार्यक्रमासाठी राजेशजी सोलापण, सुभाष लांजेकर, विवेकजी बुरडकर, नकुल वासमवार, खेमराजजी हिवसे, प्रशील पोगुलवार आणि गणेश रामगुंडेवार यांचे विशेष सहकार्य लाभले.

दरम्यान, आमदार श्री 2026 चंद्रपूर स्पर्धेतील प्रत्येक वजन गटातील पहिल्या तीन विजेत्यांची 28 ते 30 मार्च रोजी पुणे येथे होणाऱ्या “मिस्टर इंडिया” स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये