ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डायल क्रमांक ११२ वर तक्रारीचा खोडसाळपणा भोवला

लांडगा आला रे आलाची पुनरावृती भोवली..

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

     नागरिकांची सुरक्षा व शहराची सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलिस विभागाच्या कार्यात नाहक व खोटी तक्रार करणाऱ्या व्यक्तीविरोधात भद्रावती पोलीस स्टेशन येथे

अदखल पात्र अपराध क्रमांक २४२/२०२६कलम २१७ भारतीय न्याय संहिते नुसार गुन्हा नोंद करून आरोपीस समज देण्यात आली.

दिनांक १० मार्च रोजी मौजा कोंढा ता. भद्रावती निवासी दिलीपसिंह मनोजसिंह चव्हाण वय ५६ याने तात्काळ कारवाई क्रमांक ११२ वरून कॉल करून त्यांचा मुलगा नामे राहुल दिलीपसिंह चव्हाण हा मारपीट करीत असल्याची खबर दिली. घटनेचे गांभीर्य ओळखुन भद्रावती पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहचले मात्र शहानिशा केली असता तक्रार खोटी असल्याचे कळले. पोलिस पथक परत येताच पुन्हा डायल क्रमांक ११२ वर त्याच व्यक्तीने परत कॉल करून मारपीट होत असल्याची तक्रार केली.

भद्रावती पोलिस पथक पुनश्च: घटनास्थळी पोहचले मात्र अशी कोणतीही घटना घडल्याचे निदर्शनात आले नाही. सबब आरोपीने आपले कायदेशीर हक्काचा गैरवापर करून कर्तव्य बजावणाऱ्या लोकसेवकाला ११२क्रमांक डायल करून खोटी व दिशाभूल माहिती दिल्याबद्दल व जनहितार्थ दूरध्वनी क्रमांकाचा गैरवापर करून मुद्दाम खोडसाळपणा केल्याबद्दल सदर व्यक्तिविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात येऊन पुढील तपास पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात भद्रावती पोलीस स्टेशन करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये