ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्ध्यातील पुरवठा निरीक्षकांवर कारवाई करा

उच्च न्यायालयाला याचिके‌द्वारे केली मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक श्रीमती मनीषा मांजरखेडे या स्वस्त धान्य दुकानदारांना व सामान्य नागरिकांना चुकीची वागणूक देत असून त्यांचा मनमानी कारभार चालू आहे. यापूर्वी सुद्धा त्यांच्या मनमानी कारभाराने त्रस्त होऊन वेगवेगळ्या माध्यमातून प्राप्त तक्रारींची दखल घेऊन त्यांची बदली सेलू येथून वर्धा करण्यात आली. परंतु श्रीमती मनीषा मांजरखेडे ह्यांच्या कार्यशैलीत तसूभरही फरक पडला नाही. याउलट यांचे ध्यान्य दुकानदारांना व सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे प्रमाण अजूनच वाढले. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात यावी व त्यांची बदली वर्धा जिल्ह्याबाहेर तातडीने करण्यात यावी अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष समितीने जिल्ह्याचे पालकमंत्री व प्रशासनाकडे लावून धरली यामध्ये जोडलेले दुकान काढून नवीन दुकानदारांना देण्याची नवीन मोहीम आरंभली आहे. तसेच दुकान जोडणीसंदर्भात तहसीलदारांचा आदेश होण्यापूर्वी पुरवठा निरीक्षक नवीन दुकानदारांना धान्य पुरवठा करून मोकळ्या होतात. तसेच गोदामातून येणाऱ्या धान्यामध्ये ५० किलोंच्या पोत्यात अर्धा ते एक किलो धान्य कमी दिले जाते असा सावळागौधळ सुरु आहे, ह्यात लक्ष घालून कारवाई करा अशी मागणी निवेदनातून केलेली होती. त्यामुळे वरील मुद्द्‌द्यांची प्रशासनाने दखल घेत श्रीमती मनीषा मांजरखेडे ह्यांची बदली वर्धा येथून मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथे दिनांक २४.१०.२०२५ च्या आदेशान्वये करण्यात आलेली होती. परंतु मांजरखेडे हयांनी सदर बदली आदेश मुलांचे शिक्षण व आईच्या प्रकृतीचे कारण देत महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण MAT मधून दिनांक १२.१२.२०२५ च्या आदेशान्वये रद्द करून आणली.

तेव्हापासून मांजरखेडे हह्यांनी स्वस्त धान्य दुकानदार व सामान्य नागरिक ह्यांना जास्तच त्रास देणे सुरु केले व माझे कोणीही काहीच बिघडवू शकत नाही व तुम्ही कितीही तक्रारी करा माझ्‌यावर काहीच कारवाई होऊ शकत नाही व ने स्वस्त धान्य दुकानदार व सामान्य नागरिक माझ्या विरोधात जातील त्यांच्यावर गुन्हा दाखल करून दुकानांचा परवाना रद्द करण्याची धमकी देत आहे.

ह्या सर्व त्रासाला कंटाळून मांजरखेडे ह्यांच्यावर कारवाई करून न्याय देण्याची मागणी स्वस्त धान्य दुकानदार व सामान्य नागरिक प्रशासनाकडे सातत्याने केली असतांना सुद्धा प्रशासन काहीच पाऊले उचलत नसल्याचे निर्देशनास आल्यानंतर वर्धा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार मार्फत स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष समिती सचिव योगेश चिंचोळकर ह्यांनी उच्च न्यायालयात अॅड. पियुष कदम ह्यांच्यामार्फत याचिका दाखल करीत दाद मागितलेली आहे. सदर याचिका लवकरच माननीय न्यायालयासमोर सुनावणीसाठी लागणार असून न्यायालय याचिका कल्यांच्या मागणीवर काय निर्णय घेते ह्याक्ते सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये