गॅस सिलेंडरचे वाढलेले भाव त्वरीत कमी करा
तालुका काँग्रेस पक्षाची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे आधीच कठीण झाले असताना केंद्रातील मोदी सरकारने एल पी जी गॅस च्या किंमतीत तब्बल 60 रुपयाने वाढवून पठाणी लूट करीत आहे. गॅस सिलेंडर च्या वाढवलेल्या किंमती केंद्र सरकारने तत्काळ कमी कराव्या अशी मागणी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांच्या कडे निवेदन देऊन करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटलं आहे की, डॉ मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात गॅस च्या किंमतीत वाढ झाली तरी त्याचा बोजा सर्वसामान्य नागरिकांवर पडू दिला नाही, सबसिडी देऊन जनतेला महागाईचे चटके बसू दिले नाही, यू पी ए सरकारच्या काळात घरगुती गॅस सिलेंडर 400 रुपये मध्ये मिळत होता, मात्र मोदी सरकारच्या काळात 900 रुपये पेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहे, व्यावसायिक गॅस सिलेंडर च्या किंमतीत सुद्धा प्रचंड वाढ करून 1900 रुपये केली आहे,या दर वाढीचा फटका विद्यार्थी, कामगार, नोकरदार, वर्गाला बसला आहे, हॉटेल बंद होण्याच्या मार्गावर आहे, गॅस सिलेंडर च्या किंमतीत वाढ झाल्याने खाद्यपदार्थ चे भाव सुद्धा वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा केंद्र सरकारने तत्काळ सिलेंडरच्या किंमतीत केलेली वाढ कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
नायब तहसीलदार सायली जाधव यांना निवेदन देताना काँग्रेसचे जेष्ठ नेते रमेश दादा कायंदे, तालुका अध्यक्ष रामदास डोईफोडे, हनीफ शहा, रविंद्र इंगळे, प्रा. अशोक डोईफोडे, गणेश आडे, मतीन चाऊस, प्रकाश राजे, राजाराम खांडेभराड, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



