ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाज मंदिराच्या जागेवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवण्यासाठी आमरण उपोषण सुरू 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा नगर परिषदेने स्थानिक मागास वर्गीय नागरिकांच्या सुविधेसाठी 1985,86 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वॉर्ड क्रमांक दोन, चिखली रोड या ठिकाणी 66.66 चौरस फूट जागा उपलब्ध करून समाज मंदिर चे बांधकाम केले आहे.

सदर जागा उपलब्ध करून देत असताना जागेची चतुर्सिमा ठरवून दिली होती. परंतु सदर जागेसंदर्भात खोटे दस्तऐवज तयार करून परस्पर खरेदी करण्यात आली असून साबीर शाह गफार शाह यांना नगर परिषद मार्फत देण्यात आलेली बांधकाम परवानगी तात्काळ रद्द करून समाज मंदिराच्या जागेवर झालेले अतिक्रमण तत्काळ हटवून जागा नगर परिषद च्या ताब्यात घेण्यात यावी यासाठी बौद्ध समाज बांधवानी समाज भवन समोर आज 10 मार्च पासून आमरण उपोषण सुरु केले आहे.

बौद्ध समाज बांधवांनी याबाबत जिल्हाधिकारी यांना 26 फेब्रुवारी रोजी निवेदन दिले होते, त्यात परवानगी रद्द न केल्यास 10 मार्च पासुन आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता, त्यानुसार आजपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.

आमरण उपोषणाला गौतम खरात, आकाश कासारे, आकाश साळवे, संतोष वाघ, जगन्नाथ पाखरे, यश कासारे, सुधीर हिवाळे, संगपाल सरकटे, बबन कासारे, समाधान पाखरे, अतिश कासारे, विजय कासारे, भीमराव कासारे, रोहित चित्येकर, अमर कासारे, सौरभ पाखरे, पंढरीनाथ मांदळे, समाधान पारवे, भगवान साळवे उपोषण ला बसले आहेत, नगर परिषद ला देण्यात आलेली 66.66 चौरस फूट जागा मोजणी करून ताब्यात घेण्यात यावी व केलेल्या नोंदी रद्द कराव्यात, व झालेले अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्यात यावे अशी मागणी आंदोलन करत्यांनी केली आहे

उपोषण स्थळी नगर परिषद अध्यक्ष माधुरी शिपणे,मुख्याधिकारी अरुण मोकळ, माजी अध्यक्ष संतोष खांडेभराड, विविध राजकीय पक्षांचे नेते यांनी भेट दिली, कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये