जिल्हा पोलिस दलातर्फे सेवानिवृत्त व मयत पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या समस्यांबाबत आढावा बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस दलातून निवृत्त व मयत झालेले अधिकारी व अंमलदारांचे सेवानिवृत्तीनंतरचे लाभ आणि इतर प्रशासकीय अडचणी तातडीने सोडवण्यासाठी वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे विशेष आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत मयत व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रकरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सदर बैठकीत प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा करून संबंधित विभागाला कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. वर्धा शहर, हिंगणघाट, सेलु आणि पुलगाव येथील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीचे फरक (Difference), ग्रॅच्युइटी आणि रजेचे पैसे (Eamned Leave) मिळण्यास होत असलेल्या विलंबाबाबत आढावा घेण्यात आला. यामध्ये २००९ पासूनची वेतनवाढ आणि २०२५ मधील लाभांच्या प्रकरणांचा समावेश आहे.
तसेच अनेक कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचे लाभ मिळण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन पात्र लाभार्थ्यांना त्वरित लाभमिळवून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
निवृत्तीनंतरच्या वैद्यकीय योजनाः सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार मिळणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि योजनांचा लाभ विनाअडथळा मिळावा, यावर बैठकीत भर देण्यात आला.
इतर प्रशासकीय बाचीः निवडणुकीच्या कामाचे मानधन (Election Cell 2014-25), पदोन्नतीमधील तांत्रिक अडचणी आणि पी.एफ. (GPF) संदर्भातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात आली.
पोलीस प्रशासनातर्फे दर तीन महिन्यांनी अशा प्रकारच्या बैठकांचे आयोजन करण्यात येणार असून, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पाष्ट करण्यात आले.



