ब्रम्हपुरीत झाडीबोली साहित्य मंडळातर्फे सात महिलांना नारीशक्ती पुरस्काराचे वितरण
जो मानासाठी मागे आणि सेवेसाठी पुढे होतो तोच व्यक्ती लोकप्रिय होत असतो - बंडोपंत बोढेकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
झाडीबोली साहित्य मंडळ शाखा–ब्रह्मपुरीच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती पुरस्कार आणि झाडीबोली प्रिमियर लीग स्पर्धेचे पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन नेवजाबाई हितकारीणी महाविद्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणेदार प्रमोद बानबले यांचे हस्ते झाले तर अध्यक्षस्थानी झाडीबोली साहित्य मंडळाचे केंद्रीय सदस्य ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. ३३ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. धनराज खानोरकर, समीक्षक डॉ. संजयकुमार निंबेकर, प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर, ब्रम्हपुरी शहराचे नगरसेवक राकेश पडोळे,झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हा प्रमुख अरूण झगडकर, गणेश कुंभारे, शाखाप्रमुख संतोष मेश्राम, सचिव धनंजय पोटे आदींची उपस्थिती होती.
यावेळी श्री. बोढेकर म्हणाले की, साहित्य हे समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम आहे. कवींनी व साहित्यिकांनी समाजातील प्रश्न, वेदना आणि वास्तवाचे दर्शन आपल्या लेखणीतून घडवले पाहिजेत. जो मानासाठी मागे आणि सेवेसाठी पुढे होईल तोच व्यक्ती लोकप्रिय होईल. पद- प्रसिद्धी पेक्षा निष्काम सामाजिक सेवा व जीवन मूल्यांची जपणूक हीच साहित्यिकांची खरी ओळख असावी, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी डॉ. खानोरकर आणि डॉ. निंबेकर यांनी समयोचित विचार व्यक्त करून काव्य स्पर्धा आयोजनाबाबत शाखेचे कौतुक केले. मुल येथील प्रा. रत्नमाला भोयर यांच्या संत तुकाराम या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तर गुलाब बिसेन द्वारा संपादित वायगावची बालकविता संग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. प्रकाशित पुस्तकांवर अरूण झगडकर यांनी भाष्य केले.
सूत्रसंचालन कवी लक्ष्मण खोब्रागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन धनंजय पोटे यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त शाखेच्या वतीने प्रा. रत्नमाला भोयर (मुल), अर्चना खंडाते, कल्पना गेडाम, डॉ. विद्या शेळके (ब्रम्हपुरी), सविता धमगाये (नागपूर), उज्वला उसेंडी (कोरची), किरण चौधरी (गडचिरोली) इत्यादींना नारीशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर झाडीबोली प्रिमियर लीग स्पर्धेचे पारितोषिक डॉ प्रवीण किलनाके, दिनेश कुमार अंबादे, डॉ. अलका दुधबुरे, अर्जूमन शेख, वृषाली चोरे, नीरज आत्राम, संजय बिसेन, मधुकर दुफारे, जगदीश मुनघाटे, सुनील बावणे आदींना प्रदान करण्यात आले. दुसऱ्या सत्रात राज्यस्तरीय कवी संमेलन झाडीचा फुलोरा चे आयोजन प्रा. विनायक धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी हिरालाल पेंटर, प्रशांत भंडारे, डॉ. प्रवीण किलनाके, सुखदेव चौथाले, सुरेश डांगे, रामकृष्ण चनकापुरे , डॉ हितेंद्र धोटे, सुरेश सुरजुसे वर्धा,नरेंद्र गंधारे हिंगणघाट,संजय बिसेन, संजीव बोरकर, प्रकाश कोडापे, वृंदा पगडपल्लीवार, संगीता बांबोळे,नत्थु चिमूरकर, प्रीती चहांदे, डॉ. पद्माकर वानखेडे,सुरेश गेडाम, परमानंद तिराणिक,सोनाली सहारे,रोशनी दाते, सुजाता अवचट,ज्योत्स्ना बन्सोड , विधी बन्सोड,रंजना चुधरी,यामिनी मडावी वंदना सोरते,अनुराग मुळे,आदींनी आपल्या काव्य रचना प्रस्तुत केल्यात.
तसेच राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या कवी-साहित्यिकांनी आपल्या कविता सादर करत रसिकांची दाद मिळवली.


