ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयामध्ये दिनांक 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. रामकृष्ण पटले यांनी केले असून अध्यक्षता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शैलेंद्र देव यांनी केले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी व वक्ता म्हणून डॉ. योगेश खेडकर सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, रसायन शास्त्र विभाग, विदर्भ महाविद्यालय जिवती प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी विज्ञान दिन का साजरा करावा आजचे युग हे विज्ञानाची युग आहे वैज्ञानिक वातावरण समाजामध्ये निर्माण करण्यासाठी आपली फार मोठी भूमिका आहे असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमासाठी प्रा. चटारे सर, डॉ.बांदरे सर, प्रा.वानखेडे सर, डॉ.मुन सर, प्रा. वैद्य सर, डॉ.घोडीले सर, डॉ.शर्मा सर, डॉ.खान सर इत्यादी शिक्षक हजर हजर होते. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कुमारी नेहा भोयर या विद्यार्थिनीने केले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये