ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होळी पर्वातील फिरणारी “घाणमाकड” इतिहासात लुप्त

मोबाईलच्या युगात हरवल्या बालपणीच्या आठवणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           होळी जवळ आली की गावागावातील चौकात फिरणाऱ्या “घाणमाकडीचा” आवाज आणि त्यावर झोके घेत होळीच्या पर्वावर मुलांची धमाल सुरू व्हायची. मात्र या आजच्या डिजिटल युगात हा पारंपारिक ग्रामीण खेड लुप्त झाला असून नव्या पिढीला तो आता मात्र चित्रांमधून पाहायला मिळत आहे.

        साधारणता मागील ३० ते ३५ वर्षांपूर्वी “घाणमाकड” हा खेळ खेळ्यापाड्यात, तालुक्यात व जिल्ह्यातिल मुलांच्या मनोरंजनाचा आधार होता व तो पाहायला मिळत होता. उन्हाळ्याची चाहूल लागताच मुले पारंपारिक खेळांमध्ये होत असे. त्यावेळेस टेलिव्हिजन, संगणक, मोबाईल अशी आधुनिक साधने सहज उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे खेड्यातील मुलांना परंपरागत खेळातूनच आनंद शोधावा लागत होता.

       हा होळीचा असा येताच गावातील काही तरुण मुले एकत्र येऊन शेतातील तसेच रानातील पळसाच्या झाडांची लाकडे आणत असून त्याच पळसाच्या लाल- पिवळ्या फुलांपासून नैसर्गिक रंग तयार करात असायचे. तसेच पळसाच्या वाकड्या – कोकड्या आकाराच्या लाकडाला मधोमध छिद्र पाडून ते गावातील चौकात तसेच सावली देणाऱ्या एखाद्या झाडाखाली गाळून त्यावर घाण माकड बसवली जायची. दिवसा झाडाखाली तर रात्रीला चौकातील घाणमाकडीवर मुलांची गर्दी असायची. घाणमाकडीवर दोन्ही बाजूंनी मुले बसत असून आडी-पाडीने झोके घेत या घाणमाकडीचा आनंद घ्यायची. हे घाण माकड फिरताना कर्कश आवाज यावा म्हणून काही मुले या घाणमाकडीच्या छिद्रात बिब्यांच्या बिया, गारगोट्या, वाघनख़्या टाकत असायचे. गावातील मुले या घाण मागणीचा आनंद घेत असताना गावातील लोक त्यांच्या या आनंदात सहभागी व्हायचे.

“होळीतून घाणमाकड परंपरेची सांगता”

          होळी, रंगपंचमीच्या दिवशी घाणमाकडीसाठी वापरलेली लाकडे ही तिथून उपटून होळीमध्ये टाकली जायची. त्यानंतर पळसाच्या झाडाच्या फुलांपासून बनविलेल्या नैसर्गिक रंगांनी रंगपंचमी साजरी करायची. उन्हाळा लागतात गुराखी आपल्या ढोरा-गुरांना घेऊन गुरांची शाळा आमराईत किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली भरवत असे. तेव्हा गुराखी सुद्धा याच झाडाखाली किंवा आमराईत लटकून या घाणमाकडीचा खेळ खेळत असायचा.

मात्र आता ना चौकात घुमणाऱ्या घाणमाकडी चा आवाज उरला. ना ती गुरांची वस्ती उरली. काळ बदलला, मनोरंजनाची साधने बदलली मात्र ते बालपण आणि त्या बालपणीच्या आठवणी व त्या आठवणीतील धमाल आजही आमच्या तशेच ज्येष्ठांच्या आठवणीत ताज्या आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये