ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

आमदार किशोर जोरगेवार यांनी मांडवे परिवाराची घेतली भेट

चांदा ब्लास्ट

      शहरातील इंदिरानगर रेल्वे पटरीजवळ राहणारे वामन मांडवे आणि त्यांचे सुपुत्र राहुल मांडवे यांचा विजेचा धक्का लागून झालेला दुर्दैवी मृत्यू संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारा ठरला आहे. एका क्षणात बाप-लेक दोघांचेही निधन झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

   या दुःखद घटनेची माहिती मिळताच आमदार किशोर जोरगेवार यांनी शुक्रवारी मांडवे परिवाराच्या निवासस्थानी भेट देऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी परिवारातील सदस्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिला.

   स्व. वामन मांडवे आणि स्व. राहुल मांडवे यांचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि मन सुन्न करणारा आहे. एका क्षणात बाप-लेक दोघांचेही आयुष्य संपुष्टात येणे ही अत्यंत वेदनादायी घटना आहे. परिवाराच्या डोळ्यातील वेदना पाहून मन अत्यंत व्यथित झाले. अशा कठीण प्रसंगी संपूर्ण समाजाने परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे अशी प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. यावेळी भारतीय जनता पार्टीचे महामंत्री रविंद्र गुरुनुले, सविता दंढारे, मनपा गटनेते शेखर शेट्टी, नगरसेवक नितेश गवळी, जितेश कुळमेथे यांच्यासह स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये