ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लखमापूर शाळेत अवतरले बाल वैज्ञानिक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर :_ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लखमापूर येथे राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोरेश्वर जोगी यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील व समिती सदस्य संदीप तोडसे, उपाध्यक्षा अश्विनीताई बुऱ्हाण, सदस्य नितीनजी शेंडे तसेच शिक्षकवर्ग, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय अध्यक्षांनी रिबन कापून केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विज्ञानविषयक माहिती सांगून विविध प्रयोग सादर केले. हवेला वजन असते, पाण्याची घनता, प्रकाशाचे विकेंद्रीकरण, न्यूटनचे प्रयोग, परिस्कोप, स्मार्ट शेती, वॉटर हार्वेस्टिंग, स्थिर विद्युत निर्मिती अशा अनेक प्रयोगांनी विज्ञानाचे मूलभूत तत्त्व स्पष्ट केले.

– विद्यार्थ्यांनी कल्पकतेने व आत्मविश्वासाने प्रयोग सादर केले. – मान्यवरांनी प्रत्येक प्रयोगाची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. – प्राथमिक ते उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. – प्रयोगांमधून वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता व आत्मविश्वास वाढीस लागला.

शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षकवर्ग व पालकांच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या उत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा, ज्ञानार्जनाची आवड आणि प्रयोगशीलता विकसित झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये