अट्टल गुन्हेगारास मोठ्या शितिफाने घेतले ताब्यात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सदर प्रकरणाची हकीकत याप्रमाणे आहे की, नमुद घटना ता. वेळी व स्थळी यातील फिर्यादी रुपेश महादेवराव पखाले वय 40 वर्ष रा. बुध्द विहार जवळ स्टेशन फैल वर्धा हा त्याचे घरी झोपुन असता यातील आरोपीतानी त्याचा घराचा दरवाजा ठोकला असता फिर्यादीने कोण आहे म्हणुन आवाज दिला असता आरोपीतांनी फिर्यादीस आम्हाला मदत पाहीजे असे म्हटल्यावर फिर्यादीने दरवाजा उघडला तेव्हा आरोपीतांनी फिर्यादीचे घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन त्यातील एका आरोपीने फिर्यादीचे चेहऱ्यावर तिखट फेकुन फिर्यादीसोबत झटापट करून फिर्यादीचे घरी ठेवून असलेला जुना सेकंडहॅन्ड एलई डी टि व्ही सॅनसुई कंपनिचा 2500/- रुपयाचा जबरीने चोरुन नेला फियादीचे तोडी रिपोर्ट व मेडीकल सर्टीवरुन सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून मा. पोलीस अधीक्षक सा वर्धा यांनी तपासाबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या त्याप्रमाणे पो नि संजय गायकवाड यांनी एक पथक आरोपी शोध करीता गठीत करून त्यांना गुहयाचा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा कडून समांतर तपास करण्याचे निर्देश दिले. वरिष्ठांनी दिलेल्या सूचना प्रमाणे तपास करीत असताना सदर गुन्हा हा वर्धा जिल्ह्यातील तडीपार व रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार सोहेल खान उर्फ मोंढा याने केला असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याचेबाबत गोपनीय माहिती काढून सदर आरोपींचे शोध कामी पथकासह नागपुर शहर येथे जाऊन तेथे आरोपीचा शोध घेऊन त्यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले व पुढील कारवाई करिता पो स्टे वर्धा येथे गुन्ह्यांचे तपास अधिकारी याचे ताब्यात देण्यात आले.
सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन सर, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे सर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड सर यांचे निर्देशाप्रमाणे पोउपनी बालाजी लालपालवाले, पो.हवा. गजानन लामसे, यशवंत गोल्हर, राजेन्द्र जयसिंगपुरे, रितेश शर्मा यांनी केली



