ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा उपविभागीय पोलीस पथक यांनी केले खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी नामे सचिन किसन काबळे वय 32 वर्ष रा इतवारा बजार वर्धा याचे घरा समोर फिर्यादीचे बहीनीचे गोळया बिस्कीट व सिगारेटचे दुकान असुन दिनांक 21/07/2023 रोजी रात्री 20.00 वाजता दरम्यान यातील अरोपी नामे धिरज गौतम रा. इतवारा बजार वर्धा हा फिर्यादीचे दुकाना मध्ये पैशे न देता सिगारेट मागुन फिर्यादीचे बहीनीला शिवीगाळ करीत होता त्या मुळे फिर्यादी हा तेथे आला व वाद सोडविले व त्या नंतर फिर्यादीचा भाउ सुरज गौतम हा तेथे आला व फिर्यादी यास आपला वाद हा मोहल्यातील आहे आपन आपसात निपटुन टाकु असे सांगुन त्यास आपले घराकडे नेत असता सददु कंजरभाट रा. इतवारा बजार, वर्धा यांचे घरा समोर आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी संगणमत करून फिर्यादीस मोठया धारदार चाकुने छातीवर व मानेवर मारून जमखी केले त्या वरून फिर्यादी यांचे मृत्युपूर्व बयान वरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे दिनांक 22/07/2023 चे रात्री 1.46 वाजता अपराध क्रमांक 844 / 2023 कलम 307,34 भा.द.वि चा गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास पोउपनि प्रविण पाटील हे करीत आहे.

सदर गुन्हयाची दखल घेत वर्धा उपविभागीय पोलीस पथक यांनी श्री रोशन भु. पंडीत उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब वर्धा याचे आदेशान्वये त्यांचे चमुने खुनाचे प्रयत्न करनारा फरार असलेला आरोपी नामे धिरज श्याम गौतम वय 30 वर्शे रा. इतवारा बजार, वर्धा यास मोठ्या शिताफितीने ताब्यात घेवुन पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे पुढील कार्यवाही करीता ताब्यात दिले.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. नुरूल हसन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा, याचे विषेश मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री रोशन पंडीत सा. यांचे सुचनेप्रमाणे, पो. उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे नापोशि अमर लाखे, पो. पि. पवन निलेकर, समीर पेख, मंगेष चावरे, पो.उप.नि प्रविण पाटील यांनी यषस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये