नाकेबंदी करून दारूबंदी कायद्यान्वये रेड करीत संपुर्ण माल जप्त
एकूण 6 लाख 95 हजारावर माल जप्त - दोन फरार आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
गुह्याची हकीकत याप्रमाणे आहे की, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा द्वारे पोस्टे वर्धा शहर परिसरामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करिता पेट्रोलिंग करीत असताना खबरे प्रमाणे नमूद आरोपी याचेवर स्नेहल नगर वर्धा येथे नाकेबंदी करून प्रो रेड केला असता आरोपी यास समोर पोलिस असल्याची चाहूल लागताच आपल्या ताब्यातील वाहन आमचे पासून लांबच कारचा चालक मयुर मंद्रीले व कारमधील एक इसम असे गाडीतुन उतरून गल्ली बोळीचा फायदा घेऊन पळून गेले पाठलाग केला असता मिळून आले नाही. मोक्यावरील कारची पाहणी केली असता कारमध्ये 1) एक जुनी वापरती मारुती सुजूकी कंपनीची स्वीफ्ट कार क्र. MH-32-C-6853 की.5,00,000 रु.2) 3 खरडयाच्या खोक्यात ऑफीसर चॉईस कंपनीच्या विदेशी दारुच्या 180 एम.एलच्या 144 निपा प्रत्येकी 300/- रू प्रमाणे कि 43,200/- रू 3) दोन खरडयाच्या खोक्यात व एका चुंगडीत रॉयल स्टॅग कंपनी च्या विदेशी दारुच्या 180 ml च्या एकूण 108 निपा प्रत्येकी 350/- रू प्रमाणे 37,800/ – रू4) एका खरडयाच्या खोक्यात ऑफिसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारुच्या 180 एम.एल च्या एकूण 48 निपा प्रत्येकी 350 रु प्रमाणे 16,800 रु.5) एका चुंगडीत रॉयल चलेंन्ज कंपनीच्या विदेशी दारुच्या 180 ml च्या 18 निपा प्रत्येकी 350/- रू प्रमाणे 6,300/ – रू,6) एका खरडयाच्या खोक्यात देशी दारू च्या टॅगो पंच कंपनीच्या 90 mlच्या 100 शिश्या प्रति शिशी 100 रु 10,000 रु,7) एक जुना वापरता अँपल कंपनीचा आयफोन मोबाईल कि. 70,000 रु.8) एक जुना वापरता mi कंपनीचा मोबाईल कि. 10,000 रु.9) एक जुना वापरता किपॅड मोबाईल कि. 1000 रु. असा एकूण जु.कि 6,95,100/- रु.चा मुद्देमाल मुद्देमाल बिनापास परवाना अवैध्यरित्या वाहतूक करीत असताना मिळून आल्याने मोक्का जप्ती पचनामा प्रमाणे जप्त करून आरोपी 1) स्वीफ्ट कार क्र. MH-32-C-6853 चा चालक मयूर मंद्रीले, रा. स्नेहल नगर वर्धा (फरार) 2) एक अनोळखी इसम (फरार)विरूद्ध कलम 65 (अ)(ई), 77(अ),83 म.दा.का सह कलम 3(1)181, 130/177 मो.वा.का. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन सर, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे सर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड सर यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार मनोज धात्रक, नरेंद्र पाराशर, संजय बोगा,विनोद कापसे सर्व स्थानिक गुन्हे शाखा व अनुप कावळे, सायबर सेल वर्धा
वर्धा यांनी केली