ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजुरा येथे शिवजयंती सोहळा उत्साहात संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अंबादास वार्ड (जवाहर नगर), राजुरा येथील समाजभवनात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. एकनाथ सातपुते, प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. घोडिले सर , तसेच सेवानिवृत्त क्लर्क (WCL)श्री. नत्थुजी हेपट, श्री. गजानन भटारकर, श्रीमती पार्वताबाई नवले व श्रीमती इंदिराबाई बोढे हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी, संघटन कौशल्य आणि जनकल्याणकारी राज्यकारभाराचा गौरव केला. त्यांनी युवकांना शिवरायांचे आदर्श जीवनात अंगीकारण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात शिवाजी महाराजांवरील पोवाडे, प्रेरणादायी भाषणे यामुळे वातावरण भारावून गेले. वॉर्डातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा.नरेंद्र हेपट यांनी केले. शेवटी उपस्थितांना प्रसाद वितरण करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये