ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुकुल महाविद्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

    गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदा येथे महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाद्वारे विद्यापीठाच्या पत्रानुसार 20 फेब्रुवारी रोजी मराठी पत्रकारितेचे जनक आणि समाज सुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे, गुरुकुल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.राजेश डोंगरे वाणिज्य विभागाचे डॉ. प्रशांत पुराणिक प्रा. सचिन कर्नेवार,प्रा. आशिष पईनकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

     सदर कार्यक्रमात डॉ. अनिल मुसळे यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू केले. भारतातील ब्रिटिश राजवटीत ते या वृत्तपत्राचे संपादक होते. या वर्तमानपत्रातून त्यांनी प्रबोधनाचे कार्य केले असे मार्गदर्शन केले. गुरुकुल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश डोंगरे यांनी सुद्धा या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले.

     हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सुशांत खिरटकर, प्रफुल मुसळे,संतोष चौधरी, सविन मडावी, प्रशांत नवले, शालिक कांबळे, ननिता बुरान्ह व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये