ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयात शिव जयंती निमित्ताने भव्य कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालयात स्वराज्याचे संस्थापक, पराक्रम, धैर्य व न्यायनिष्ठेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास संस्थेचे सचिव सतीश कायंदे, व्याख्याते डॉ. किरण जायभाये, प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, कार्यक्रम अधिकारी योगेश चकदळे, नर्सिंग कॉलेज चे प्राचार्य योगेश ताठे, प्राध्यापक, स्वयंसेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांनी शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे युगपुरुष असून हिंदवी स्वराज्याची स्थापना करून स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारे दैवत असल्याचे सांगितले.

संस्थेचे सचिव सतीश कायंदे यांनी आपल्या मनोगतात शिवाजी महाराज हे आदर्श प्रशासक, उत्कृष्ट योद्धा आणि प्रजाहितदक्ष राजा होते, असे नमूद केले. डॉ. किरण जायभाये यांनी प्रभावी व्याख्यानातून शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व, त्यांची दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी राज्यकारभार यांचा उहापोह केला. राजमाता जिजाबाई यांच्या संस्कारातून घडलेले शिवराय आणि दादोजी कोंडदेव यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घेतलेले लष्करी शिक्षण याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. त्यांच्या ओघवत्या भाषणाने विद्यार्थ्यांची मने जिंकली.

जयंती उत्साहानिमित्त विद्यार्थ्यांनी पालखीतून शिवरायांची भव्य मिरवणूक काढली. ढोल-ताशांच्या गजरात शिवाजी महाराजांना विराजमान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्यार्थिनी साक्षी भालाधरे हिने केले.

या जयंती सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य, राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमानाची भावना जागृत झाली. कार्यक्रमास रा से यो स्वयंसेवक व विद्यार्थी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये