कारला चौकात एम.डी. विक्रेत्यावर धडक कारवाई
रामनगर पोलिसांकडून 1.56 लाखांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा | 19 फेब्रुवारी 2026 रोजी रामनगर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाने कारला चौक परिसरात सापळा रचून मँथेडॉन (एम.डी.) विक्री करणाऱ्या आरोपीस अटक केली.
विश्वसनीय गुप्त माहितीनुसार शनिमंदिर परिसरात संशयितावर कारवाई करण्यात आली. आरोपी जुनेद खान शकील खान पठाण (वय 23, रा. इंदिरा नगर, आर्वी नाका, वर्धा) याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून—
4.43 ग्रॅम एम.डी. पावडर (किंमत अंदाजे ₹17,720)
विवो कंपनीचा मोबाईल (₹15,000)
रोख रक्कम ₹4,000
सुझुकी बर्गमन दुचाकी (₹1,20,000)
असा एकूण ₹1,56,720 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलिस स्टेशन रामनगर येथे आरोपी विरुद्ध अपराध क्रमांक 153/2026 कलम 8(क)21(बी)एनडीपीएस ॲक्ट 1985 अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला असून सदरची कार्यवाही वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजय भुसारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबादास टोपले परि.पोलीस उपनिरीक्षक अमोल चाटे आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश कांबळे सहायक फौजदार राजेश साहू पोलीस हवालदार योगेश चन्ने पोलीस हवालदार अजहर खान नायक पोलिस काॅस्टेबल नितेश वैद्य पोलीस अंमलदार घनश्याम पाटील पोलिस अंमलदार सचिन पवार पोलिस अंमलदार राहुल भोयर पोलीस अंमलदार सुरज राठोड पोलीस अंमलदार भुषण दांडेकर पोलीस अंमलदार प्रशांत शाहू पोलीस अंमलदार गजानन मस्के पोलीस अंमलदार विशाल देवकाते पोलीस अंमलदार प्रसाद शिंदे यांनी केली आहे
अमली पदार्थांविरोधात पोलिसांची ठोस आणि सततची मोहीम सुरू.



