महाराष्ट्र शासनाचे राज्य पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ. संजय गोरे यांचा सनराइज् योगा वुमन्स ग्रुप तर्फे सत्कार.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गोंडवाना विद्यापीठाचे व्यवस्थापन व सिनेट सदस्य तथा गडचांदूर येथील शरदराव पवार महाविद्यालयाचे प्राध्यापक व राज्यशास्त्र विभाग प्रमुख यांना महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा राज्यस्तरीय डॉ. जे.पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार 2025-26 हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गडचांदूर येथील प्रसिद्ध सनराइज योगा ऍक्टिव्हिटी वुमन्स ग्रुप तर्फे महाविद्यालयात येऊन त्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय कुमार सिंह, वुमन्स ग्रुपच्या अध्यक्षा कुंतल चव्हाण, सर्व प्राध्यापक वृंद, सनराइज वुमन्स ग्रुप चे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ.संजय गोरे हे 2012 पासून विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणावर कार्यरत असून त्यांची 10 पुस्तके व त्यांच्या मार्गदर्शनाखाली 11 विद्यार्थ्यांना पी. एचडी.पदवी प्राप्त झालेली आहे.डॉ. संजय गोरे हे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक असून विविध संशोधन पत्रिकेत 77 लेख प्रकाशित झाले असून त्यांचा 100 च्या वर राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग आहे. त्यांना या आधी गोंडवाना विद्यापीठाचा विद्यापीठस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तथा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रमाधिकारी पुरस्कार प्राप्त झाला आहे. विद्यापीठाच्या सर्व समित्यांवर अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी कार्य केले असून गोंडवाना विद्यापीठाच्या मॉडेल कॉलेज आणि युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थांच्या गव्हर्नमेंट बॉडी वर कार्यरत आहे. डॉ.गोरे हे सिनेट सदस्य म्हणून विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नासाठी सक्रियपने कार्य करीत आहे.
डॉ.गोरे यांच्या कार्याची दखल घेऊन गडचांदूर येथील प्रसिद्ध सनराइज योगा ऍक्टिव्हिटी वुमन्स ग्रुपच्या च्या वतीने अध्यक्षा कुंतल चव्हाण यांचे नेतृत्वाखाली डॉ.गोरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सनराइज ग्रुपचे महिला सदस्य उपस्थित होते. यावेळी वुमन्स ग्रुपचे सदस्यांनी सनराइज योगा ऍक्टिव्हिटी ग्रुप बद्दलच्या कार्याची भरीव माहिती दिली. यावेळी सत्कार समारंभाचे संचालन डॉ. शरद बेलोरकर यांनी केले.



