ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रा. सुमेधा श्रीरामे यांची सिनेसृष्टीत गगन भरारी

सुप्रसिद्ध पल्याड चित्रपटाच्या यशानंतर ; कौमार्य चित्रपटात झडकणार

चांदा ब्लास्ट

 “कौमार्य” परिक्षा चाचणी ही प्राचीन काळापासूनच्या चालत असलेली कुप्रथा आहे. कौमार्य अबाधित आहे की नाही याची तपासणी लग्नाच्या पहिल्या रात्री करण्याची प्रथा आजही २१ व्या शतकात केली जाते. खरेतर स्त्रीयांवर हा पुरूष प्रधान संस्कृतीचा अमानवीय अत्याचार आहे. अशा कृप्रवृत्तीचा विरोध होणे गरजेचे आहे. याच विचारातून  “कौमार्य” चित्रपटाची निर्मिती केली आहे. कौमार्य हा चित्रपट २८ जुलैपासून सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
      या चित्रपटाचे निर्माता नरेंद्र जीचकार, चारुदत्त जीचकार, दिग्दर्शक सलीम शेख, संगीत विरेंद्र लाटणकर, पुष्कर देशमुख, छायाचित्र हर्षद जाधव, संकलन मिलिंद कुलकर्णी यांनी केले आहे. या चित्रपटाला बघण्याकरीता प्रा. सुमेधा श्रीरामे यांच्या फॅन्स ची व विद्यार्थ्यांची हुरहूर वाढलेली दिसून येत आहे. शालेय स्पर्धा असो की महाविद्यायीन, किंवा नाट्यस्पर्धा यात प्रा. सुमेधा श्रीरामे यांची भूमिका ही प्रेक्षकांना अंतर्मुख करून सोडणारी आहे. हे प्रेक्षकांनी वेळोवेळी दाखविले आहे.
               प्रा. सुमेधा श्रीरामे यांनी बिऱ्हाड या कादंबरीवर असरुबा हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत सादर केलेलं आहे. मागील वर्षी हौशी राज्य नाट्य स्पर्धेत “बातमीची गोष्ट” या नाटकात विशेष भूमिका साकारलेली होती. व त्या स्पर्धेत शासनाचा अभिनयाचा पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला. याचबरोबर आभाळमाया, जमाव, या लघुचित्रपट तसेच दारवठा, फिरस्तू, पल्याड या दीर्घ चित्रपटात भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आणि आता कौमार्य या चित्रपटात सुद्धा भूमिका साकारली आहे. येत्या २८ जुलै ला सर्वत्र प्रदर्शित होणारा हा चित्रपट नक्कीच विदर्भातील कलेला, अभिनयाला, संस्कृतीला उंच शिखरावर नेणार हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये