वर्धा जिल्हयातील १३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी पोलीस भरती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस शिपाई भरती २०२४-२५ संबंधाने वर्धा जिल्हयातील १३४ पोलीस शिपाई या रिक्त पदांसाठी (पुरुष व महिला पोलीस शिपाई) पाग्नीस भरती प्रकिया सुरु असून आज दिनांक १८.०२.२०२६ रोजी शारीरीक चाचणी करीता एकूण ८९९ उमेदवार कोन्नविण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात एकूण ५९४ उमेदवार आज रोजी हजर आले. त्यापेको शारीरीक मोजमापान अपरा उमेदवार ३६ व मैदानी चाचणीत अपात्र ठरलेले उमेदवार एकूण १६५ तसेच मैदानी चाचणीत पात्र ठरलेले उमेदवार एकूण ३९३ असं आहेत.
तसेच दररोज पोलीस भरती करीता करीता येणा-या उमेदवारांना मैदानाजवळच नाश्ता, झरीक्स मशीन, फोटोग्राफरची व्यवस्था, वैद्यकिय सुविधा, अॅम्बुलंस, टिकठिकाणी मोबाईल टॉयलेटची सुध्दा सोय करण्यात आली आहे
तरी सर्व नागरीकांना व उमेदवारांना आवाहन करण्यात येते को, जर कोणी आपणांस पेशाची मागणी करुन पोलीस भरतीमध्ये लावुन देण्याचे आमिप देत असल्यास अशा आमिपाला व भूलथापांना बळी पडू नये. संपूर्ण पोलीस भरतीची प्रक्रिया ही निःपक्षपाती व पारदर्शक असून संपूर्ण मैदान परिसरात CCTV कैमरे आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे व चांगल्या वातावरणात राबविण्यात येत आहे.
सौरभकुमार अग्रवाल
पोलिस अधीक्षक, वर्धा



