ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

छत्रपती शिवाजी महाराज चौक, पोंभुर्णा येथे सालाबादप्रमाणे यावर्षी 19 फेब्रुवारी 2026 रोजी पुतळा समिती व पोंभुर्णा भाजपा कमिटी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या वेळी उपस्थित मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रम, स्वराज्य स्थापनेतील योगदान व त्यांच्या आदर्शांबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले. परिसरात देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारावून गेले होते.

कार्यक्रमाचे आयोजन पुतळा समिती व स्थानिक भाजपा पदाधिकारी यांच्या पुढाकाराने करण्यात आले. हरी पाटील ढवस तालुका अध्यक्ष अजित मंगळगिरीवार उपनगराध्यक्ष राहुल संतोष सौ सुलभा पिंपरे नगराध्यक्ष कृषी कोटरंगे राहुल पाल गुरु दास पिपरे दर्शन गोरंटीवार मोहन चालक चरण गुरनोले गजानन म ड पु वार ईश्वर नेताम महेश रणदिवे राजू ठाकरे नंदा किशोर तुममोलवार सो आकांक्षी गेडाम उषा गोरंतवार सोनी ढोले नंदा कोटरंगे तसेच युवक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जयंती सोहळा यशस्वी केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये