ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे स्वयंपाक गृह बांधकाम व लोकार्पण सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ समाजाच्या विकास करीत असताना आजूबाजूच्या गावातील मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देत, ज़िल्हा परिषद प्राथ. शाळा, लिंगणडोह येथे स्वयंपाक गृहाचे बांधकाम करून ते तेथील शाळेला वापरा करिता दिनांक 23 जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमला वेळी माईन्स अधिकारी शैलेश सरपटवार यांच्या हस्ते फीत कापून व शिक्षक व गावातील प्रतिष्टीत नागरिक यांच्या हस्ते नारियल फोडून स्वयंपाक गृहाचे लोकार्पण करण्यात आले. उपस्थित सर्व विध्यार्थी व नागरिकांना लाडुचे वाटप करून तोंड गोड करण्यात आले.

या स्वयंपाक गृहाच वापर शालेतील मुलांचे मध्यंतरी भोजन बनविण्यास होईल तसेच इतके मजबूत व सुंदर स्वयंपाक गृह पूर्ण तालुक्यात फक्त आमच्या शाळेत माणिकगढ मुळे बनू शकले असे प्रतिपादन शिक्षक व नागरिकांनी केलेत व माणिकगढ कंपनीचे आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये