ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात मणिपूर मधील क्रूर अत्याचाराच्या विरोधात निषेध आंदोलन व

चांदा ब्लास्ट

मणिपूरच्या महिलांसोबत जे झालं ती घटना अत्यंत संतापजनक, लज्जास्पद  आहे. प्रत्येक भारतवासीयांची मान शरमेने खाली जाईल अशीच आहे. महिलांवर झालेल्या या क्रूर व अमाननीय अत्याचाराच्या विरोधात व त्यांना न्याय देण्यासाठी वरोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रविवारी २३ जुलै २०२३ सकाळी १० वाजता आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या नेतृत्वात वरोरा महीला काँग्रेस तर्फे उद्या धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
               मणिपूर मधील समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत. ती हादरवणारी आहेत. दोन्ही सरकारांना लाज वाटणारी हि घटना आहे. राज्य व केंद्र सरकार या प्रकरणाला न्याय देण्यास अपयशी ठरत असेल तर राष्ट्रपतींनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन दोषी नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त वरोरा येथील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन वरोरा ग्रामीण व शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये