ताज्या घडामोडी

कनिष्ठ महविद्यालयीन शिक्षकांचा 12 वी बोर्ड उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

शासनाच्या असंवेदनशिलतेचा शिक्षकामध्ये प्रचंड असंतोष

चांदा ब्लास्ट

    शिक्षणातील महत्त्वाच्या मागण्यासंदर्भात गेली अनेक दिवसांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ व विज्युक्टा वारंवार लोकशाही मार्गाने आंदोलन करीत आहे मात्र शासन व शिक्षण विभाग सातत्याने त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, त्यामुळे शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे.

        हिवाळी अधिवेशनावर केलेल्या प्रचंड आंदोलना नंतर बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे माननीय शिक्षण मंत्र्यांनी मान्य केले होते परंतु कोणत्याही प्रकारची चर्चा व बैठक घेण्याची तसदी शिक्षण मंत्रालयाने घेतली नाही. त्यामुळे परत आंदोलन करायला शासनाने नाईलाजाने भाग पाडले आहे.

 आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात संघटनेतर्फे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत न्याय मागण्यांसंदर्भात निवेदन सादर करण्यात आले.

 आंदोलनाचा दुसरा टप्पा सोमवार दि. 12 फेब्रुवारी 2024 ला शिक्षण उपसंचालक कार्यालयावर प्रचंड धरणे देऊन आंदोलन करण्यात येणार आले व मागण्यांचे निवेदन शासनापर्यंत पाठविण्यात आले व बहिष्काराचा इशारा देण्यात आला,यानंतरही शासनाच्या संवेदना जागृत झाल्या नाही व शासन ताठर भूमिका घेत आहे असे दिसून येत आहे म्हणून नाईलाजास्तव कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ आणि विजुक्टा संपूर्ण राज्यभर 12 वी बोर्ड परीक्षेच्या मुल्यांकनावर बहिष्कार आंदोलनाची भूमिका जाहीर करीत आहे.

आंदोलनातील मागण्या

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी अर्धवेळ,विना तसेच अंशतः अनुदानावरील नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व सेवानिवृत्तांना या योजनेचा तातडीने लाभ द्यावा.

१ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.

उच्च माध्य. ला अनुदानासह घोषित करून अंशतः अनुदानावरील शाळा व कमवि ला प्रचलित अनुदान सुत्राने 100 % अनुदान द्यावे.

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०,२०,३० वर्षाची आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना त्वरित लागू करावी.

विनाअनुदानित कडून अनुदानित मध्ये बदली स्थगिती उठवावी.

कमवि तुकडी मान्यतेसाठी शाळा संलग्न २१ विद्यार्थी व महाविद्यालय संलग्न ३१ विद्यार्थी ग्राह्य धरावेत.

शिक्षकांची सर्व रिक्त पदे त्वरीत भरावीत.

उपदानाची रक्कम २०लाख करावी व निवृत्तीचे 60 वर्ष करावे.

DCPS/NPS हिशेब, 6व्या व 7 व्या वेतन आयोगाचे थकित हप्ते त्वरित द्यावेत.

घड्याळी तासिका शिक्षकांचे मानधन वाढवावे,उपप्राचार्य यांना वेतन वाढ द्यावी.

     शुन्य कार्यभारा शिवाय शिक्षकाला अतिरिक्त करू नये. अशैक्षणिक कामे देऊ नये. या व इतर मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात येत आहे.

     चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक जे बोर्ड चे Examiner, Moderator आणि Chief moderators आहेत यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग द्यावा आपण सर्वांनी कोणत्याही मूल्यांकनाचे कामासंदर्भात बैठकीला उपस्थित होऊ नयेत आणि संघटनेला पाठबळ देऊन आपल्या विधायक मागण्या मान्य करून घेण्यास सहकार्य करावे असे आवाहन चंद्रपूर जिल्हा कार्यकारणीचे अध्यक्ष डॉ.प्रविण चटप,सचिव प्रा.प्रमोद उरकुडे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.विजय गायक वाड,सावली तालुका अध्यक्ष प्रा.शेखर प्यारमवार सचिव प्रा. कन्नाके व कार्यकारणी पदाधिकारी यांच्या तर्फे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये