ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुरात ब्राऊन शुगर अंमली पदार्थाची विक्री

दोन आरोपी अटकेत ; एकूण ५७ हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट

      चंद्रपुरात छुप्या पध्दतीने ब्राऊन शुगर या अंमली पदार्थाची विक्री सुरू आहे, अश्यातच शहर पोलिसांनी दोघांना अटक करीत ब्राऊन शुगर जप्त केले.

      दि. ९ जानेवारीला शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, सोहेल शेख नामक युवक हा लपून ब्राऊन शुगरची विक्री करतो, माहितीच्या आधारे पोलीस स्टाफने रेड करीत २३ वर्षीय सोहेल शेख सलीम शेखला अटक केली.

      सोहेलची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळून ७.१२ ग्राम वजनाचे ब्राऊन शुगर सहित एकूण ५७ हजार ९१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सोहेलची अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की सदर ब्राऊन शुगर हे भंगाराम वार्ड येथे राहणारा ३८ वर्षीय आवेश शब्बीर कुरेशी याचे असून मी फक्त विक्री करतो.

      शहर पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक करून ताब्यात घेतले असू दोघांवर NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        सदरची कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतिशसिंह राजपूत, सपोनि मंगेश भोंगाळे, रमिझ मुलानी, पोउपनी शरीफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, इम्रान खान, भावना रामटेके व संतोष पंडित यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये