ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देवाडा खुर्द येथे महिला मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रम 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा :- तालुक्यातील देवाडा खुर्द येथे बंडूभाऊ बुरांडे मित्रपरिवार यांच्या वतीने महिला मेळावा व सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा सत्कार कार्यक्रम दि.३१ जानेवारीला पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरूनुले यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश महामंत्री अल्का आत्राम, प्रमुख उपस्थिती पोंभूर्णा नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सुलभा पिपरे,माजी सरपंच बंडू बुरांडे,बाजार समीतीचे संचालक रवी गेडाम,माजी उपसभापती ज्योती बुरांडे,वैशाली बोलमवार, ईश्वर नैताम,मधुकर टिकले,अजय मस्के,गुरूदास पिपरे,राजू ठाकरे,प्रतिक वैरागडे यांची उपस्थिती होती.

या मेळाव्यात महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, स्वयंसहायता गटांचे महत्त्व, आरोग्य, शिक्षण व आर्थिक स्वावलंबन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास गावातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी महिलांनी संघटित होऊन योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.सोबतच आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू बुरांडे, संचालन एकता बंडावार यांनी केले तर आभार प्रदर्शन रंजीत गेडाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बंडू बुरांडे मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाला परिसरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये