ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लखमापूर शाळेच जिल्हास्तरीय टीमकडून भरभरून कौतुक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

“मुख्यमंत्री माझी स्वच्छ सुंदर शाळा” या उपक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यातील मूल्यांकन नुकतेच जिल्हास्तरीय टीमकडून पार पडले. या टीमचे नेतृत्व माननीय चौरे साहेब (उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर) यांनी केले. टीम मधील सन्मा. देशमुख साहेब (उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर), मान. मासिरकर मॅडम (विस्तार अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर) तसेच माननीय सूर्यकांत भडके (साधन व्यक्ती, जिल्हा परिषद चंद्रपूर) यांचा समावेश होता.

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, लखमापूर (केंद्र बाखर्डी, पंचायत समिती कोरपना, जिल्हा चंद्रपूर) या शाळेचे मूल्यांकन करताना टीमने शाळेतील विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, परिसरातील स्वच्छता, शैक्षणिक वातावरण, भौतिक सुविधा आणि शाळेतील शिस्त यांचे तोंडभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना देशमुख साहेबांनी मुलांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. संपूर्ण टीमने विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शब्द दिले आणि आनंदाने “टाटा-बाय-बाय” करत निरोप दिला.

या यशामागे शाळेचे मुख्याध्यापक विनोदी क्षीरसागर सर यांचे नेतृत्व, शिक्षकवृंदाची निष्ठा, शाळा व्यवस्थापन समितीचे मार्गदर्शन, ग्रामपंचायतीचे पाठबळ, पालकांचा सहभाग तसेच माजी विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे. सामूहिक प्रयत्नांमुळे शाळेची गुणवत्ता उंचावली असून शाळा आज जिल्हास्तरीय स्तरावर आदर्श ठरत आहे.

शाळेच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये