ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चैतन्य युवा पुरस्कारासाठी बोबडे, पिदूरकर चोथले,पिज्दूरकर,ढोबे,पासपुते यांची निवड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती आणि तेलंगण स्टेट मधील श्रीगुरुदेव सेवा मंडळ गोयेगाव, निशानी, सावरखेडा, खैरी,सांगवी शाखांच्या संयुक्त विद्यमाने गोयेगाव (मंडल -केरामेरी), जि‌.आसिफाबाद येथे राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलन येत्या दि. ७ व ८ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आले आहे. सदर संमेलन जि.प. शाळेच्या प्रांगणात होणार आहे.

स्थानिक सर्व ग्रामस्थ,युवक व महिला मंडळाच्या सहकार्याने सदर संमेलन होत असून या संमेलनात राष्ट्रसंत साहित्य दिंडी, उद्घाटन समारंभ, विशेष पुरस्कार वितरण, ग्रामगीतावर आधारित परिसंवाद, प्रबोधन संध्या, खंजिरी कीर्तनाचा कार्यक्रम, ध्यानपाठ व सामुदायिक प्रार्थना, योग प्राणायामपर मार्गदर्शन, स्वच्छता अभियान, श्रमदान, ओवीसंबधाने स्वअनुभवकथन, समारोप आदी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

       संमेलन स्थळ गोयेगाव हे के.बी. आसिफाबाद (तेलंगण स्टेट) जिल्ह्यात असून आसिफाबाद – केरामेरी मार्गावर आहे. संमेलनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या चैतन्य युवा पुरस्कारासाठी श्री.गजानन बोबडे (पंचाळा),श्री.सुरेंद्र चोथले(परसोडी),,श्री.मनोहर पासपुते(मानोली),श्री.अनिल पिदूरकर(कोहपरा),श्री.प्रकाश ढोबे(भालर),

रितेश पिजदूरकर(मुल) यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटनप्रसंगी आ. कोवा लक्ष्मी (आसिफाबाद), अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख गोपाल कडू आदी मान्यवर उपस्थित असणार आहे तसेच समारोपीय कार्यक्रमास खास. घोडाम नागेश (आदिलाबाद), आदर्श राजगड चे शिल्पकार चंदू पाटील मारकवार, सिध्देश्वर संस्थान पटणापूर चे अध्यक्ष केशवदादा इंगळे आदींच्या उपस्थितीत होणार आहे. चैतन्य युवा पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांचे परिषदेचे पदाधिकारी इंजि. रविंद्र बोबडे,विलास उगे, सुभाष पावडे, प्रा. नामदेव मोरे, गणेश मांडवकर , देवराव कोंडेकर, हरिश्चंद्र बोढे संजय तिळसम्रुतकर , संजय पोडे, श्रीकांत धोटे आदींनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये