शासकीय तंत्रनिकेतन ब्रह्मपुरीच्या विद्यार्थिनींनी पटकावले कबड्डीचे विजेतेपद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी : आयइडीएसएसए आय झोन नागपूर अंतर्गत मुलींची कबड्डी स्पर्धा गोविंदराव वंजारी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नोलॉजी, नागपूर येथे नुकत्याच आयोजित करण्यात आल्या. यामध्ये शासकीय तंत्रनिकेतन ब्रम्हपुरीच्या संघाने उत्कृष्ठ खेळ करत विजेतेपद पटकावले. या संघात ऋतुजा जीवतोडे (कर्णधार) यांच्या नेतृत्वात मानसी महेंद्र सोंडवले, गायत्री प्रवीण चतारे, हर्षा भोजराज कापगते, लक्ष्मी मेश्राम, छकुली म्हशाखेत्री, अश्विनी चिंतमवार, उज्वला शेंडे, राजेश्वरी लांजेवार, भैरवी उंदीरवाडे यांनी उत्कृष्ठ खेळ दाखवला व विजेतेपद पटकावले. खेळाडूंना प्रा. हर्षदा आकोटकर, प्रा. मीनाक्षी मानलवार, कु. नयना खानोरकर, कु. सोनाली वाघमारे आणि श्री. सौरभ देशपांडे यांचे मार्गदर्शन लाभले. संघाच्या यशाकरिता डॉ. राजन वानखडे, प्र. प्राचार्य, डॉ. आशिष बहेन्डवार, उपप्राचार्य यांच्यासह सर्व विभागप्रमुख प्रा. माधुरी नागदेवे, प्रा. जयंत बोरकर, प्रा. शालिनी खरकाटे, प्रा. उज्वला रामटेके, प्रा. नितीन डोर्लीकर तसेच कर्मशाळा अधीक्षक प्रा. प्रशांत खानोरकर यांनी अभिनंदन केले.



