ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीच्या ग्रामीण रुग्णालय परिसरात घुसला बिबट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्या लगत आयुध निर्माणि वसाहत व जंगलव्याप्त परिसर असल्याने आणि मुख्यत्वे वन्यप्राण्यांचे हक्काचे अधिवास क्षेत्र असल्याने वन्यजीवांचा वावर नवलाईचा विषय नाही. मात्र जंगलातील अधिवास सोडून जेव्हा वन्यप्राणी नागरी वसाहतीकडे वळतो तेव्हा सुरू होतो मनुष्य व वन्यजीव संघर्ष.

भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील ग्रामीण रुग्णालय परिसर व श्रीराम नगर परिसरात मागील पाच ते सहा दिवसापासून बिबट्याचे दर्शन होत असल्याने या परिसरात असूरक्षितता वाढली दी. २३ च्या मध्यरात्री हाच बिबट ग्रामीण रुग्णालय भद्रावती परिसरात आढळून आला असल्याने नागरिक भयभीत होऊन रात्रीचे घराबाहेर पडण्यास धजावत नसल्याने अघोषित कर्फ्यु लागू झाल्याचे अनुभवास येत आहे.

काही हौसी नागरिकांनी मोबाईल चित्रीकरण करून बिबट असल्याची खात्रीशीर माहिती दिली तसेच परिसरातील कुत्रे सुद्धा त्याने फस्त केल्याचे सांगण्यात आले.
नागरिकांनी वन विभागाला कळवले असता दिनांक २३ च्यारात्री बिबट्यास त्याच्या अधिवासात पिटाळण्यात आल्याचे एकीकडे वनाधिकारी सांगतात मात्र परिसरातील प्रभावित नागरिक याला दुजोरा द्यायला तयार नसून बिबट याच परिसरात असल्याचे खात्रीलायक माहिती देत आहे.

भर वसाहतीत बिबट्याच्या वावरामुळे लहान मुले, गुरे ढोरे, यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता असल्याने या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन जयेश विश्वंभर टेके यांनी वनाधिकारी भद्रावती यांना देऊन त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये