ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी महाविद्यालय येथे नेताजी सुभाष चंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली,एक महान देशभक्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव होते,प्रास्तविक डॉ. मनोहर बांद्रे यांनी केले. नेताजी सुभाषचंद्र एक महान नेतृत्व होते ज्यांनी भारताच्या स्वतंत्रतेसाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी बंगालच्या कटक येथे झाला. ते एक वकील होते, पण त्यांनी आपली नोकरी सोडून स्वतंत्रता संग्रामात सामील झाले.

त्यांनी आजाद हिंद फौज स्थापन केली आणि “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा” असे नारे देऊन देशभक्तीची एक नवचैतन्य निर्माण केले. त्यांचा देशभक्तीचा भाव आणि नेतृत्वाने भारतीयांना स्वतंत्रतेसाठी प्रेरित केले.

त्यांच्या काही घोषणा होत्या

– “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा”

– “जय हिंद”

आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे ही त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा चेतन वैद्य यांनी मानले. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये